उच्च शिक्षणासाठी आता बाहेर जाण्याची गरज नाही : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पारुल विद्यापीठाचे उद्घाटन; शैक्षणिक क्रांती घडणार
Goa News
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
Published on
Updated on

पणजी : गोव्यात पहिल्या खासगी पारुल विद्यापीठाची सुरुवात झाल्यामुळे आता उच्च शिक्षणासाठी गोमंतकीय विद्यार्थ्यांना परदेशात किंवा इतर राज्यांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. आता गोव्यातच विविध प्रकारचे उच्च शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे आता शैक्षणिक क्रांती घडून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास नक्कीच मदत होईल. सरकारच्या या निर्णयामुळे गोवा शैक्षणिक हब बनण्यात महत्वाचे योगदान मिळाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते कला अकादमीत विद्यापीठाच्या कॅम्पसचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थापक डॉ. देवांशू पटेल, गीतिका पटेल आणि पारुल पटेल यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

ते म्हणाले की, माझ्या कारकिर्दीत खासगी विद्यापीठाचे विधेयक मंजूर करण्यात आले. याचा गोमंतकीय विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार असून या विद्यापीठात 70 टक्के विद्यार्थी आणि शिक्षक हे गोव्यातीलच आहेत. यापूर्वीपर्यंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा त्यांना हव्या त्या कोर्सेस साठी इतर ठिकाणी जावे लागत होते. त्यांना दुप्पट पद्धतीने आर्थिक फटका तर बसत होताच, सोबत घरापासून दूर रहावे लागत असल्याने त्यांच्या खाण्यापिण्याचा आणि काळजीचा प्रश्नही गंभीर होता. मात्र या सर्व गोष्टींवर पारुल विद्यापीठामुळे तोडगा निघाला आहे.

पारुल विद्यापीठ गोव्यात झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवरील आर्थिक भार कमी झाला आहे. त्यामुळे जे लोक या विद्यापीठाला विरोध करत होते त्यांनी हे विद्यार्थी आणि पालकांना विचारावे की हा निर्णय किती गरजेचा होता. देशातील केवळ काहीच विद्यापीठ असे आहेत, ज्यांना नॅक अ ++ चे मानांकन मिळाले असून टॉप 50 सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थापैकी पारूल विद्यापीठ एक आहे. केपे येथे उभारलेले हे संकुल काळानुरूप वाढण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले यावेळी फाउंडेशनचे संचालक देवांशू पटेल म्हणाले की, गोव्यात आमचे विद्यापीठ उभारण्यामध्ये सरकारचे मोलाचे योगदान लाभले. सध्या 13 अभ्यासक्रम सुरू असून 550 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये आम्ही गोमंतकीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक दरात 20 टक्के सवलत दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news