Verem Hastakala Bhavan | वेरे येथे उभारणार आधुनिक 'हस्तकला भवन' महिला सक्षमीकरणाला अन् स्थानिक कारागिरांना मिळणार नवी दिशा

Verem Hastakala Bhavan | आमदार केदार नाईक : वेरे येथील नूतन हस्तकला भवन जागेची पाहणी
handi craft
handi craft
Published on
Updated on

पर्वरी : पुढारी वृत्तसेवा
महिलांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी, पारंपरिक हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी वेरे येथे उभारण्यात येणारे नूतन हस्तकला भवन महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे साळगावचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन केदार नाईक यांनी सांगितले. जुन्या हस्तकला भवनाचे पाडकाम करून त्याठिकाणी नवीन एकमजली हस्तकला भवन उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली असून, आमदार नाईक यांनी नुकतीच कामाची पाहणी केली.

handi craft
Drug Case Goa | ड्रग्ज, गुन्हेगारी, अवैध कृत्यांविरुद्ध गोवा पोलिसांची राज्यव्यापी कारवाई; रेल्वे स्थानकांतही तपासणी मोहीम

महिला सक्षमीकरण आणि स्थानिक हस्तकलेला चालना देण्याच्या उद्देशाने या हस्तकला भवनाची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. नवीन भवनामुळे स्थानिक कारागीर आणि महिला उद्योजकांना आधुनिक व समर्पित जागा उपलब्ध होणार आहे. पारंपरिक हस्तकलेच्या वस्तूंचे उत्पादन आणि विक्री करण्यासाठी त्यांना याठिकाणी सुविधा मिळणार आहेत.

या हस्तकला भवनामध्ये विशेषतः महिला उद्योजक आणि स्थानिक कारागीरांना त्यांच्या पारंपरिक उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी समर्पित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायांना बळकटी मिळण्यासोबतच महिला उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल. नूतन हस्तकला भवनाच्या उभारणीसाठी आवश्यक कामांना सुरुवात झाली असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील महिला उद्योजक आणि कारागीरांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

handi craft
CM Pramod Sawant | गोव्यातील स्थानिक कारागिरांना मोठा दिलासा! 'गोवा हाट' अन् 'कुणबी ग्राम'चे डिसेंबरपर्यंत उद्घाटन

आर्थिक स्वावलंबनासाठी प्रकल्प

स्थानिक कारागीरांना त्यांच्या उत्पादनांसाठी अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध होण्यास या प्रकल्पामुळे मदत होणार आहे. तसेच पारंपरिक कला आणि हस्तकलेचे जतन व संवर्धन होऊन स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास हातभार लागणार आहे. नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी संधी उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प ठरणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news