

पणजी : लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनतर्फे बॅ. नाथ पै यांच्या स्मरणार्थ कोकणात सांस्कृतिक विद्यापीठ उभारले जाईल व तेथे सांस्कृतिक व संगीत शिक्षण दिले जाईल, अशी घोषणा लोकमान्य कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण ठाकूर यांनी केली. कांपाल पणजी येथे आयोजित गोवा पुस्तक महोत्सवात राज्यातील साहित्यिकांचा फाऊंडेशनतर्फे गौरव केल्यानंतर ठाकूर बोलत होते.
यावेळी नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पद्मश्री विनायक खेडेकर व किशोर मासिकाचे प्रमुख किरण केंद्रे उपस्थित होते. पद्मश्री खेडेकर यांनी गोवा पुस्तक महोत्सव गोव्याच्या सांस्कृतिक वारशात भर घालणारा सोहळा असल्याचे सांगितले. दरम्यान, यावेळी किरण केंद्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.