

देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणामुळे निर्माण झालेला संताप हा केवळ एका परीक्षेपुरता मर्यादित नाही. हा संताप संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विकृत झालेल्या चेहऱ्याविरोधातील आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारी ही व्यवस्था आता इतकी निर्वावलेली झाली आहे की, विद्यार्थ्यांना माणूस म्हणून नव्हे, तर रैंक निर्माण करणारे प्रॉडक्ट म्हणून पाहिले जात आहे.
टायअप कॉलेजेस, कोचिंग माफिया, पेपरफुटीचे रॅकेट, पालकांचा अवास्तव दबाव आणि समाजाने तयार केलेली डॉक्टरच व्हायला पाहिजे, ही मानसिकता या सगळ्यांच्या गिरणीत आजची तरुणाई भरडली जात आहे.
'झुरळ पार्टी' हा शब्द जरी आक्रमक वाटत असला, तरी आज हजारो मुलांचे आयुष्य पाहिले, तर तो वास्तवाला भिडणारा शब्द वाटू लागतो. एसी क्लासरूममध्ये दिवसाला १२-१२ तास कोंबलेली, स्पर्धेच्या रेसमध्ये स्वतःची ओळख हरवलेली आणि शेवटी मानसिकदृष्ट्या कोलमडलेली ही पिढी नक्की कुठे चालली आहे, असा प्रश्न आता देशाने विचारण्याची वेळ आली आहे.
'नीट' पेपरफुटीनंतर आधी झालेली परीक्षा रद्द झाली. नव्याने परीक्षा घेण्याचा निर्णय झाला, हा कालावधी विद्यार्थ्यांसाठी केवळ वेटिंग पीरियड नाही. हा मानसिक छळाचा कालखंड आहे. लाखो विद्यार्थी पुन्हा पुस्तकांसमोर बसले, पुन्हा ताणाखाली आले, पुन्हा त्याच प्रश्नांच्या भोवऱ्यात अडकले. कोणत्या मुलाच्या घरात आनंद उरला असेल? कित्येक पालकांनी मुलांना फोन, टीव्ही, सोशल मीडिया बंद करून पुन्हा अभ्यासाला बसवले. मुले अभ्यास करत आहेत की, शिक्षा भोगत आहेत, हा प्रश्न आहे.
सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या पेपरफुटीनिमित्त ज्या कोचिंग क्लासेसची नावे समोर आली, त्या क्लासेसमध्ये दरवर्षी ४०-४० हजार विद्यार्थी प्रवेश घेत असल्याची माहिती समोर आली. आता वास्तव बघू. वैद्यकीय शिक्षणाच्या जागा किती? हजार, दोन हजार किंवा काही हजार, मग उर्वरित विद्याथ्यांचे काय? त्यांच्या स्वप्नांचे, त्यांच्या पालकांनी ओतलेल्या पैशांचे काय? हा सरळसरळ शिक्षणाच्या नावाखाली चालणारा उद्योग नाही का?
एका बाजूला पालकांना, 'तुमचं मूल डॉक्टरच होणार' अशी स्वप्ने विकली जातात आणि दुसऱ्या बाजूला लाखो मुलांना स्पर्धेच्या विहिरीत ढकलले जाते. त्यातून काही मुले बाहेर पडतात, काही टिकतात आणि हजारो मुले मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त होतात. अनेकांना स्वतःला अपयशी समजण्याचा आजार जडतो. काही मुले नैराश्यात जातात. काही आत्महत्येपर्यंत पोहोचतात. पण या मृत्यूंची जबाबदारी कोण घेणार पेपर विकत घेणाऱ्या पालकांबाबत तर अक्षरशः हसावे की रडावे, असा प्रश्न पडतो.
मुलगा डॉक्टर व्हावा म्हणून लाखो रुपये मोजून पेपर विकत घेतला जातो. पण हे पालक एक साधा प्रश्न स्वतःला विचारतात का? समजा तुमचे मूल अशा प्रकारे डॉक्टर झाले आणि उद्या त्याने चुकीचा उपचार केला, एखादा रुग्ण गेला, तर त्या मृत्यूचे ओझे कोण उचलणार? डॉक्टरकी ही फक्त डिग्रीची गोष्ट नाही. ती संवेदनशीलतेची, अभ्यासाची, मेहनतीची आणि प्रत्यक्ष कौशल्याची गोष्ट आहे. आज समाजात अनेक एमबीबीएस डॉक्टरांपेक्षा बीएएमएस किंवा बीएचएमएस डॉक्टरांकडे अधिक गर्दी असते. कारण रुग्णाला केवळ मोठी पदवी नको असते, त्याला दिलासा, विश्वास हवा असतो. नाते हवे असते.
आज अनेक मोठ्या पदव्या घेऊन बसलेले डॉक्टर रुग्णांशी नीट बोलत नाहीत, तर अनेक छोट्या शहरांतील डॉक्टर माणुसकीने रुग्ण जिंकतात. मग या वेड्या स्पर्धेचा अर्थ काय? या संपूर्ण प्रकारात 'टायअप कॉलेजेस' हा प्रकार तर शिक्षण व्यवस्थेच्या तोंडावरचा काळा डाग आहे. ENTS A SSAI NEET EXAM NEET EXAM शिक्षण उपसंचालक कार्यालयांना माहिती असते की, कोणती कनिष्ठ महाविद्यालये कोणत्या क्लासेससोबत टायअपमध्ये आहेत. मग कारवाई का होत नाही? अनेक कॉलेजेस वर्षानुवर्षे ओस पडलेली आहेत. काही ठिकाणी तर महाविद्यालयांची अवस्था गोठ्यापेक्षाही वाईट आहे.
विद्यार्थी फक्त प्रैक्टिकल किंवा परीक्षा देण्यासाठी तिथे जातात. बाकीचे शिक्षण क्लासमध्ये आणि त्या क्लासची हजेरी कॉलेजमध्ये ग्राह्य धरली जाते. ही भट्टा नाही का? शिक्षण व्यवस्थेतील हा भ्रष्टाचार इतका अंगवळणी पडला आहे की, आता तो नॉर्मल वाटत आहे. पालकही गप्प, प्रशासनही गप्प आणि राजकारणही गप्प. कारण या सगळ्या व्यवस्थेमध्ये पैशाचा महासागर वाहातो आहे. एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. गरीब आणि मध्यमवर्गीय पालक कर्ज काढतात, दागिने विकतात, जमीन गहाण ठेवतात. पण शेवटी मिळते काय? ताण, नैराश्य आणि अनिश्चितता ! आजची परिस्थिती अशी आहे की, मुलांना लहानपणापासूनच एका साच्यात टाकले जात आहे.
आठवी-नववीपासून मुलांना सांगितले जाते, 'खेळायचं नाही, वेळ वाया घालवायचा नाही, फक्त अभ्यास. दहावी संपली की, थेट वलासेसच्या तुरुंगात प्रवेश. सकाळी ७ पासून रात्री १० पर्यंत फक्त टेस्ट, रैंक, मार्क्स, टार्गेट्स! हे शिक्षण आहे की, कारखाना? पूर्वीही याच देशात डॉक्टर झाले, अभिया झाले, शास्त्रज्ञ झाले, कलाकार झाले. पण ते अश यंत्रणेतून गेले नव्हते. त्यांनी मैदानात खेळून शिक्ष घेतले. संगीत ऐकत शिक्षण घेतले.
गावातल्य शाळांमधून मोठी माणसे पडली. आजही अन हजारो उदाहरणे आहेत. मग आपण ती उदाहरणे क विसरत आहोत? समाजाने मोठा गैरसमज करून घेतला आहे 'फक्त डॉक्टर किंवा इंजिनिअर झाले, तरच आयुष् यशस्वी.' हा विचारच अनेक घरे उद्ध्वस्त करत आहे. आजच्या काळात असंख्य क्षेत्रे उपलब् आहेत. उद्योजकता, कला, मीडिया, संशोधन, शेती पर्यटन, तंत्रज्ञान, डिझाइन, स्पोर्ट्स, सोशल सेक्ट कितीतरी संधी आहेत. पण समाज अजूनही जुन्य मानसिकतेतच अडकलेला आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेच्या वेडात मुलांच्य आरोग्याकडे कोणी लक्ष देत नाही. वयाच्या १८ २० व्या वर्षी मुलांना बीपी, डायबेटीस, मायग्रेन अँझायटी, पॅनिक अटॅक यांसारख्या समस्या निर्मा होत आहेत. झोपेच्या गोळ्या घेणारी मुले वाढ आहेत. मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणा विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. हे चित्र भयाव आहे. पेपरफुटीचे प्रकरण हे फक्त गुन्हेगारीचे प्रकर नाही. हे सामाजिक अध:पतनाचे लक्षण आहे. जेवळ शिक्षण विकले जाते, तेव्हा प्रामाणिक विद्याष मरतो. जेव्हा पालक पैसे देऊन पेपर विकत घेतात तेव्हा मुलांच्या कष्टांचा अपमान होतो आणि जेव्व प्रशासन सगळे पाहनही गप्प राहाते, तेव् व्यवस्थेवरील विश्वास संपतो. आज गरज आहे, ती केवळ दोषींना अटन करण्याची नाही.
गरज आहे संपूर्ण शिक्षण मॉडेलन पुनर्विचार करण्याची. टायअप कॉलेजेसवर कठ कारवाई झालीच पाहिजे. क्लासेसमाफियांव नियंत्रण आले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मानसि आरोग्याला केंद्रस्थानी ठेवले पाहिजे आणि सर्वा महत्त्वाचे म्हणजे पालकांनी आपल्या मुलांना 'रैम मशीन' म्हणून पाहणे थांबवले पाहिजे. नाहीतर उद्या या देशात पदव्या असतील डॉक्टर असतील, अभियंते असतील पण आनंदी संवेदनशील आणि सर्जनशील माणसे उरणार नाहीत मग अशा शिक्षण व्यवस्थेचा उपयोग तरी काया आजचा प्रश्न फक्त 'नीट'चा नाही. प्रश्न आहे, आप आपल्या मुलांना माणूस बनवत आहोत की, 'जुर पार्टी'चा भाग ?
हो, अगदी झुरळ पार्टी !
SSA १६- १७ हे वय आयुष्य जगण्याचे, मित्रांसोबत खेळण्याचे असते. संगीत शिकण्याचे असते. चित्रकला, नाटक, वाचन, प्रवास, संवाद या सगळ्यांतून व्यक्तिमत्व फुलण्याचे असते. पण आजची मुले एसी क्लासरूममध्ये कोंबड्यांसारखी कोंबली जात आहेत. मैदाने ओस पडली आहेत. गिटारची जागा टेस्ट सिरीजने घेतली आहे. क्रिकेटच्या जागी एमसीक्यू आले आहेत. यातून निर्माण होत आहे, ती 'झुरळ पार्टी'! हो अगदी झुरळ पार्टी। कारण या मुलांचे जीवन बघितले, तर त्यात उत्साह उरलेला नाही, सर्जनशीलता उरलेली नाही, स्वप्नांची उधळण अलेली नाही. फक्त जगायचे, रैंक मिळवायची, पुढे जायचे एवढेच. यंत्रवत आयुष्य जगणारी ही पिढी समाजासाठी धोक्याची घंटा आहे. भावनाशून्य, तणावग्रस्त आणि सतत तुलना सहन करणारी ही तरुणाई उद्या मानसिकदृष्ट्या किती सक्षम राहील?