NCB Goa Drug Case | म्हापशात NCB ची मोठी कारवाई; चरससह अमलीपदार्थांचा मोठा साठा जप्त, तिघांना अटक

NCB Goa Drug Case | माजी नगरसेवकाच्या जावयासह तिघांना अटक ; तीन दिवसांची कोठडी
Drug Case
Drug Case Pudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) गोवा विभागाने म्हापसा परिसरात मोठी कारवाई करत मोठ्या प्रमाणात चरस आणि इतर अमलीपदार्थांचा साठा जप्त केला. या कारवाईत म्हापसा माजी नगरसेवकाचे जावई प्रणील शिंदे, सनी धूपदळे आणि शशांक बांदेकर या तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिन्ही संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Drug Case
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे म्हापसा येथे छापा टाकून ही कारवाई केली. छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात चरस तसेच इतर मादक पदार्थ आढळून आल्याचे समजते. तिघांची सखोल चौकशी सुरू असून त्यांनी हा अमलीपदार्थ कोठून खरेदी केला तसेच त्यामागील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध सीबीआय पथक लावत आहे.

या प्रकरणात अटक केलेला प्रणील शिंदे हा माजी नगरसेवक फ्रँकी काव्हाल्हो याचा जावई असल्याने एनसीबीने त्यांच्या घराची झडती घेतली होती. संशयित प्रणील शिंदे याला एनसीबीने अटक केल्याने त्याची पत्नी निकिता काव्हाल्हो हिने अटकपूर्व जामिनासाठी म्हापसा न्यायालयात अर्ज केला होता. तिने या जामिनासाठी आरोग्याचे कारण पुढे केले होते. न्यायालयाने तिला अंतरिम अटकपूर्व जामीन दिला असून अटक केल्यास तिला सशर्त जामिनावर मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news