देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
राखीव जागेवरून निवडून येऊनही वेळेत 'जातवैधता प्रमाणपत्र' सादर न करणाऱ्या तब्बल २१ ग्रामपंचायत सदस्यांचे पद रद्द करण्याचा तडकाफडकी आदेश अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिला.
एकाचवेळी १८ गावांमधील सदस्यांवर कारवाई झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. जानेवारी २०२१ च्या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शासनाने वारंवार संधी दिली होती.
अगदी ९ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ मिळूनही या २१ सदस्यांनी प्रमाणपत्र सादर केले नाही. तहसीलदारांच्या नोटीसकडेही काहींनी दुर्लक्ष केले. अखेर कायद्याच्या कचाट्यात हे सर्व सदस्य अडकले असून, त्यांना आता 'माजी सदस्य' म्हणवून घ्यावे लागणार आहे.
अपात्र ग्रामपंचायत सदस्यांची नावे
पिंपरी सय्यद- प्रवीण मुकुंद लोखंडे, मुंगसरे अनिता मुरलीधर घोरपडे, कालवी - सुनीता गणपत पवार, बंडू राजाराम पारधी, बेलतगव्हाण-पुष्पा दिनकर धुर्जड, लहवित- गोटीराम केशव सूर्यवंशी, तिरडशेत-रेखा बजरंग जाधव, इंदुबाई शंकर वरघडे, वाघ शैला सोमनाथ, चांदगिरी - शांताराम शंकर कटाळे, महेंद्र रघुनाथ हांडगे, शिंदे- वंदना भाऊसाहेब जाधव, अश्विनी किरण साळवे, शिलापूर- रमेश बळवंत कहांडळ, रेशमा संदीप बर्वे, आंबेबहुला संगीता बाळू यादव, जाखोरी - चंद्रभान देवराम पवार, पळसे- रूपाली विशाल धोंगडे, लाखलगाव - बापू शंकर, वंजारवाडी बाळू गणपत लोहारे, विंचूर गवळी - दत्तात्रय दामोदर काळे.