Simhastha 2027 | कुंभसाठी तरतुदीचा अभाव : बच्छाव, कुंभसाठी भरपूर निधी : महाजन

Simhastha 2027 | दुसरीकडे अर्थसंकल्पात कुंभमेळ्यासाठी तरतूदच केली जात नसल्याचा दावा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
Girish Mahajan
Girish Mahajan NewsFile Photo
Published on
Updated on
Summary

• सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणतीही स्वतंत्र तरतूद नाही
• ‘टेम्पल टाउन’ योजनेतही नाशिकचा समावेश न झाल्याने नाराजी
• सिंहस्थासाठी सध्या सुमारे ३० हजार कोटींची कामे सुरू असल्याचा दावा
• निधी विभागनिहाय मिळतो, अर्थसंकल्पातून तरतूद होत नाही : गिरीश महाजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवघ्या काही महिन्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रविवारी (दि.१) सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद केली नसल्याने नाशिककरांकडून निराशेचा सूर व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे अर्थसंकल्पात कुंभमेळ्यासाठी तरतूदच केली जात नसल्याचा दावा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

Girish Mahajan
Mayem Mining Protest | मागण्या मान्य केल्याशिवाय खाण व्यवसाय नको

२०२७ मध्ये सिंहस्थ सुरू होणार असला तरी, ऑक्टोबर २०२६ मध्ये सिंहस्थाचे ध्वजारोहण केले जाणार असल्याने सिंहस्थास अवघे काही महिनेच शिल्लक आहेत. असे असताना, सिंहस्थ कामांसाठी मंजूर केलेला निधी बघता, अर्थसंकल्पातही निधीची भरीव तरतूद करून, विकासकामांना गती दिली जाईल, असे अपेक्षित होते.

मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्याचा नामोल्लेखही अर्थसंकल्पात केला गेला नाही. गेल्या प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी उसळलेली गर्दी पाहता, नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थात कोटींच्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजनांची आखणी केली असून, सद्यस्थितीत सुमारे ३० हजार कोटींची कामे सुरू असल्याचा दावा केला जात आहे.

सिंहस्थासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यात केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीची उपलब्धता करून दिली जाते. सध्या रेल्वेच्या पायाभूत सुविधा, रामकालपथ, विमानतळ, रिंगरोड, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद योजने अंतर्गत तीर्थक्षेत्र, रस्ते आदी कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, त्यादृष्टीने काही कामे प्रगतिपथावर आहेत.

'टेम्पल टाउन'मध्येही नाशिक दुर्लक्षित

देशातील टीयर-२ आणि टीयर-३ या शहरांमध्ये तब्बल '२० टेम्पल टाउन' विकसित केले जाणार आहेत. यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. टेम्पल टाउनसाठी मंदिरांच्या शहरांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नाशिक हे मंदिरांचे शहर आहे. मात्र, अशातही 'टेम्पल टाउन' उभारणीत नाशिककडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या २० शहरांमध्ये नाशिकचा समावेश नसल्याने, नाशिकच्या वाट्याला काहीच आले नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

Girish Mahajan
Goa Budget Reaction | अर्थसंकल्प गोव्याच्या विकासाला नवी दिशा देणारा; काजू-नारळ क्षेत्रासाठी आशेचा किरण – दामू नाईक

अर्थसंकल्पातून नाशिकला अपेक्षा

  • देशात तीन योग आणि आयुर्वेद विद्यालये सुरू करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. त्यातील एक योग किंवा आयुर्वेद विद्यालय नाशिक-त्र्यंबक येथे व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

  • मुंबई-पुणे-हैदराबाद असे ७ हायस्पीड कॉरिडॉर निर्माण करण्यात येणार असून, याचा नाशिकला फायदा होणार आहे.

  • सुरत ते आसाम असा 'डेडिकेटेड फ्राइट कॉरिडॉर' हा नाशिक-सुरत धुळे परिसरातील कृषी माल वाहतुकीसाठी जलद पर्याय म्हणून समोर येईल.

66 कुंभमेळ्याच्या निधीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जात नाही. सिंहस्थ कामासाठी आपल्याला त्या-त्या विभागाकडून निधी दिला जात आहे. संबंधित खात्यांकडून मागणीनुसार निधी मिळत आहे. प्रस्ताव गेल्यानंतर निधी प्राप्त होत आहे.

-गिरीश महाजन, कुंभमेळामंत्री

दर बारा वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदींची तसेच घोषणांची अपेक्षा होती. मात्र, कुठलीही घोषणा यात केली गेली नाही.

- डॉ. शोभा बच्छाव, खासदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news