Nana Patekar Event | 'समई' नृत्याच्या ठेक्यावर नाच अन् 'समेळ' वाद्य! गोव्यात ठरली नाना पाटेकरांची शेवटची सार्वजनिक एन्ट्री

Nana Patekar Event | बिनधास्त भाषण, अनुभवांचे किस्से अन् शालजोडीतले टोले
Nana Patekar Event | बिनधास्त भाषण, अनुभवांचे किस्से अन् शालजोडीतले टोले
Nana Patekar Event | बिनधास्त भाषण, अनुभवांचे किस्से अन् शालजोडीतले टोले
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

दोनापावला येथील एका पंचतारंकित हॉटेलमध्ये सम्राट क्लब इंटरनॅशनल तर्फे रविवारी आयोजित कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर नेहमीप्रमाणेच कोणतीही औपचारिकतेचा पडदा दूर ठेवून बिनधास्त बोलले. कोणतीही भीडभाड न ठेवता त्यांनी सल्ले दिले, अनुभव सांगितले, चिमटे काढले आणि शालजोडीतलेही दिले. त्यांच्या मिश्कील शैलीने कार्यक्रमात हास्याचे फवारे उडाले.

Nana Patekar Event | बिनधास्त भाषण, अनुभवांचे किस्से अन् शालजोडीतले टोले
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

कार्यक्रमात कोणीतरी 'क्रांतिवीर'मधील संवाद म्हणण्याची विनंती केली. त्यावर नाना म्हणाले, 'कानात पैशांची छनछन ऐकू आल्याशिवाय गळ्यातून संवाद येत नाहीत.' त्यांच्या या मिश्कील उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला. 'नाम' फाउंडेशन, त्याचा उद्देश आणि कार्य याबद्दलही त्यांनी भरभरून भाष्य केले.
त्यानंतर गोव्याच्या पारंपारिक समई नृत्य करणाऱ्या गटासोबत नाना पाटेकर नाचले. त्यांनी नृत्याचा ठेकाच धरला नाही, तर समई नृत्यावेळी वाजवले जाणारे 'समेळ' हे पारंपारिक वाद्यही वाजवले. खुर्चीवर बसून कागदावर स्केचिंगही केले. त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली.

Nana Patekar Event | बिनधास्त भाषण, अनुभवांचे किस्से अन् शालजोडीतले टोले
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री, पद्मभूषण मनोहर पर्रीकर यांच्या आठवणी सांगताना त्यांनी त्यांच्या कार्याचे आणि गुणांचे कौतुक केले. पणजीजवळील दोनापावला येथे स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहणारे नाना स्वतःला गोवेकर समजत. याच निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.
समईच्या ठेक्यावर नाचणारे, 'समेळ' वाजवणारे आणि मनमोकळेपणाने संवाद साधणारे नाना पाटेकर यांचा तोच अखेरचा जाहीर कार्यक्रम ठरला.


मी आज आहे, उद्याचे काय माहीत..?

'अरे, कार्यक्रम लवकर आटपा, माझी मंत्रमुग्ध व्हायची वेळ झाली आहे,' असे म्हणत ते जोरात हसले आणि सारे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले. भाषणादरम्यान ते म्हणाले, 'अरे, मी आज आहे, उद्याचे कुणाला माहीत! असेच आयुष्य जगायचे. जेवढे जमेल तेवढी सेवा करायची. शेवटी जाताना काय घेऊन जायचे आहे?', हे नानांचे जाहीर कार्यक्रमातील अखेरचे बोल ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news