Goa Traffic Police | मोरजीत 'नो पार्किंग'मधील वाहनांना 'व्हील लॉक'; वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू

Goa Traffic Police | मोरजी पंचायत क्षेत्रातील नो पार्किंग भागात बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाऱ्यांविरोधात पेर्णे वाहतूक पोलिसांनी 'व्हील लॉक' लावून कारवाई सुरू केली आहे. ग्रामस्थांच्या मागणीला यातून मोठे यश आले आहे.
wheel lock
wheel lock
Published on: 
Updated on: 

पेर्णे (पुढारी वृत्तसेवा):

मोरजी पंचायत क्षेत्रातील किनारी भाग आणि मुख्य रस्त्यावरील नो पार्किंग क्षेत्रात बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाऱ्याविरोधात अखेर पेर्णे वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या चाकांना व्हील लॉक लावून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून या समस्यकडे लक्ष वेधणाऱ्या ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

wheel lock
Goa Human Rights Commission | सुनावणीविना निलंबन भोवले! गोवा मानवाधिकार आयोगाने महिला व बालविकास खात्याला चांगलेच फटकारले

मोरजीतील विठ्ठलदासवाडा समुद्रकिनारी परिसरसह मुख्य रस्त्यावर पर्यटन हंगामात देशी-विदेशी पर्यटकांच्या वाहनांची मोठी गर्दी असते. अनेक पर्यटक दुचाकी आणि चारचाकी वाहने नो पार्किंग क्षेत्रात तासन्तास उभी करून समुद्रकिनाऱ्यावर जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून आणि अन्य वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. पंचायतीने संबंधित ठिकाणी नो पार्किंगचे फलकही उभारले होते.

मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत होते. या समस्यावर ग्रामसभेमध्येही वारंवार आवाज उठवण्यात आला होता. केवळ फलक लावून उपयोग नसून नियम मोडणाऱ्यांवर प्रत्यक्ष कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. यावेळी सरपंच विलास मोर्जे यांनी पर्यटन हंगामापूर्वी वाहतूक पोलिसांशी चर्चा करून कारवाईसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले होते.

wheel lock
Tillarinagar Car Accident | तिलारीनगर-गोवा मार्गावर कारचा भीषण अपघात; बेळगावचा बांधकाम कंत्राटदार जागीच ठार

त्यानुसार मोरजी पंचायतीने पेर्णे वाहतूक पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे, कारवाईसाठी आवश्यक असलेले व्हील लॉक मोरजी पंचायतीने वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिले आहेत. त्यानंतर विठ्ठलदासवाडा किनारी भागात नो पार्किंगमध्ये उभी केलेल्या वाहनांवर प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली.

कारवाईत सातत्य राखावे

पंचायतीच्या पुढाकाराचे आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र, ही कारवाई केवळ काही दिवसांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण पर्यटन हंगामात सातत्याने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. पर्यटनाला विरोध नसून पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि अधिकृत पार्किंग क्षेत्राचाच वापर करावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.