

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
या हंगामात सागरी कासवाने यापूर्वी दोन दिवसांपूर्वी येऊन ९९ अंडी घातली होती व २९ रोजी रात्री ९.३० वाजता येऊन एका सागरी कासवाने १३५ अंडी घातलेली आहे. एकूण २३४ अंडी सुरक्षित ठेवण्यात आली आहे. या अंड्यामधून ५० ते ५२ दिवसाने निसर्ग नियमानुसार पिल्ले येणार आहेत.
गेल्या वर्षी या समुद्रकिनारी भागात तब्बल २०६ सागरी कासवाने येऊन अंडी घातली होती. यंदा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एकूण दोन सागरी कासवाने एकाने ९९ व दुसऱ्याने १३५ अंडी घातलेली आहेत. सध्या कासव संवर्धन मोहीम ज्याठिकाणी आरक्षित केली होती.
तिथे समुद्राचे ओहोटीच्या वेळी पाणी पोहोचत असल्यामुळे या अंड्यांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी वन खात्याने ज्या ठिकाणी हंगामी स्वरूपाचे अभ्यास केंद्र झोपडी होती, त्या ठिकाणी जागा करून सुरक्षित अंडी ठेवण्याचे काम वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी केले आहे. समुद्रकिनारे सागरी कासवांसाठी आरक्षित केलेले आहेत.
सरकारने मोरजी व मांद्रे असे दोन मोरजी किनाऱ्यावर मोठ्या संख्येने दरवर्षी सागरी कासव येऊन अंडी घालतात. तर आश्वे भागातही कमी सागरी कासव येऊन अंडी घालतात. तेथील अंड्यानाही मोरजी तेमवाडा याठिकाणी आणून सुरक्षिता देण्याचे काम कर्मचारी करत असतात. पर्यटन क्षेत्राच्या कक्षा रुंदवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत.
वेगवेगळे आकर्षण पर्यटकांना करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विकास केला जातो. दरम्यान या कासव संवर्धन मोहिमेमुळे मोरजीचे नाव जगातील पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे झळकत आहे. दुर्मिळ कासवांची माहिती व अभ्यास करण्यासाठी जगातील कानाकोपऱ्यातून पर्यटक येतात. मात्र कायमस्वरूपी या ठिकाणी अभ्यास केंद्र नसल्यामुळे नागरिक आणि पर्यटकांची बरीच गैरसोय होते.
पर्यटकांसाठी ही मोहीम वरदान ठरावी
ही कासव संवर्धन मोहीमही पर्यटकांना आणि स्थानिकांना शाप न ठरता ते वरदान ठरायला हवी. त्या नजरेतून स्थानिक पंचायत, जिल्हा पंचायत, आमदार, खासदार आणि सरकारने संयुक्तपणे स्थानिकांना आणि पर्यटन हंगामात व्यवसाय करणाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याही व्यावसायाला कोणतीच बाधा येऊ नये. यासाठी खास नियम करावेत, अशी मागणी होत आहे. पर्यटन खास या किनारी भागात कासव संवर्धन मोहीम कशी राबवली जाते, ती पाहायला येऊ शकतात. मात्र, सरकारने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.