पणजी : मान्सूनने आज देशभरातून माघार घेतल्याचे हवामान खात्याने जाहीर केले असले, तरी राज्यात हा परतीचा पाऊस सुरू आहे. उद्या, बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता असून, यासाठीचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. अशी माहिती हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने दिली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या परतीचा पाऊस सुरू आहे. हा पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह, कडाडणाऱ्या विजा अशा स्वरूपात जिथे उतरेल तिथेच पडतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गेल्या २४ तासांत वाळपई, सांगे, साखळी, पणजी येथील मोठा पाऊस वगळता, सर्वत्र तुरळक पाऊस पडत राहिला. गेल्या २४ तासांत ६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत १००.९ मिलिमीटर पावसाची शक्यता असताना १५१.१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा ऑक्टोबर महिन्यातील ४९.८ टक्के जास्तीचा पाऊस आहे.