MLA Vijai Sardesai | मतदार यादीतील कथित फेरफार आणि 'मतचोरी'विरोधात आमदार विजय सरदेसाई यांचा गंभीर आरोप

MLA Vijai Sardesai | आमदार विजय सरदेसाई यांचा आरोप : न्यायालयात जाण्याचा इशारा
Goa legislative assembly bill 2026
MLA Vijay Sardesaipudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेवरून (एसआयआर) राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी मतदार यादीत कथित फेरफार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. राजकीय हेतूने मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या प्रकरणांची संबंधित यंत्रणांनी दखल घेऊन चौकशी केली नाही, तर न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला.

Goa legislative assembly bill 2026
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

एसआयआर प्रक्रिया हा घोटाळा असून, मतचोरी हा गंभीर प्रकार आहे, असे सरदेसाई म्हणाले. मतदार यादीतून नावे वगळण्यामागे राजकीय हेतू असल्याचे अनेक प्रकरणांवरून दिसून येत आहे. मतदार यादीत पारदर्शकता आणण्याऐवजी अन्य मतदारसंघातील मतदारांचे स्थलांतर करण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

काही मतदारांची नावे दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित करण्यात आली असली, तरी त्यांच्या घरांचे क्रमांक मूळ मतदारसंघात असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनीही आश्चर्य व्यक्त केल्याचे सरदेसाई यांनी नमूद केले.

ते म्हणाले, कुडतरी मतदारसंघातील सुमारे ५० मतदारांची नावे फातोर्डा मतदारसंघात स्थलांतरित करण्यात आली आहेत. तसेच फातोर्डा मतदारसंघातील सुमारे ४,५०० मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या कथित प्रकारामुळे आगामी निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले.

या प्रकरणामागे संबंधित मतदारसंघात तीन वेळा पराभूत झालेल्या एका इच्छुक उमेदवाराचा हात असल्याचा आरोप करत, राजकीय दबावाशिवाय असे घडणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
मतदार यादीतील कथित फेरफारामुळे आगामी निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता सरदेसाई यांनी व्यक्त केली.

प्रत्येक पात्र मतदाराला मतदानाचा अधिकार मिळणे आवश्यक आहे. मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने स्थलांतरित केली जात असतील किंवा यादीतून वगळली जात असतील, तर ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी निवडणूक गैरप्रकारांनी प्रभावित असल्याचा आरोपही सरदेसाई यांनी केला. मतदार यादीतील त्रुटी समोर आणणे, हा पक्षाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदार यादीत आपले नाव कायम आहे की नाही, याची तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. मतदारांनी नाव, पत्ता आणि मतदारसंघाची माहिती काळजीपूर्वक तपासावी. नाव वगळले असल्यास निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियमानुसार दुरुस्ती किंवा हरकतीची प्रक्रिया पूर्ण करावी.

Goa legislative assembly bill 2026
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

'एसआयआर'पूर्वी ११.८५ लाख मतदार
राज्यात एसआयआर प्रक्रियेपूर्वी ११,७५,०३४ मतदार होते. एसआयआरच्या मसुदा मतदार यादीत ही संख्या १०,८४,९९२ झाली. अंतिम मतदार यादीत १०,५७,५६६ मतदार पात्र ठरवण्यात आले. म्हणजेच, मसुदा यादीतील संख्येच्या तुलनेत अंतिम यादीत २७,४२६ मतदार कमी झाले, तर एसआयआरपूर्वीच्या संख्येच्या तुलनेत १,२७,४६८ मतदारांची नावे कमी झाली. यामध्ये सुमारे २५ हजार मृत मतदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या प्रक्रियेला आव्हान दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news