

पर्वरी : पुढारी वृत्तसेवा
नेहरूनगर मधील एका घराला आग लागून आगीत सुमारे ७ लाखांचे नुकसान झाले असे समजते. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीप्रमाणे रविवारी (दि.२१) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नेहरुनगरमधील आशा सप्रे यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर आग लागल्याचा संदेश तेथून जाणाऱ्या वाटसरूने अग्निशमन दलाला कळविले दलाचे जवान घटनास्थळी जाऊन आग विझवण्यात आली.
या आगीत सुमारे सात लाखांचे सामान जाळून खाक झाले असुर त्यात घराचे छत, विद्युत उपकरणे, कपडे, फर्निचर आणि इतर किमती सामानांचा समावेश आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे घर मालकाने सांगितले. यावेळी दलाचे प्रमुख संदीप नाईक यांच्यासमवेत सलीम शेख, निलेश गावडे, महादेव नाईक, निहाल गोवेकर, मोहन नाईक, तुषार मांद्रेकर, योगेश मयेकर, सिद्धेश गावकर आणि इतर जवानांनी आग विझवण्यात यश मिळविले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.