मडगाव : कोलवा पेट्रोलपंपाजवळ सीएनजी सिलिंडरला गळती, अन् मोठा अनर्थ टळला

सीएनजी सिलिंडरला गळती
सीएनजी सिलिंडरला गळती

मडगाव; पुढारी वृत्तसेवा कोलवा येथील पेट्रोलपंपाला सीएनजी गॅसचा पुरवठा करण्यासाठी इंडियन ऑइल अदानी गॅस कंपनीचा ट्रक आला होता. या ट्रक मधील सिलिंडरला गळती लागल्‍याची घटना घडली. यामुळे खळबळ माजली. परिस्थितीचे गंभीर्य ओळखून सीएनजीने भरलेला तो ट्रक ढकलून बाहेर काढण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दल आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गॅसची गळती बंद करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश न आल्याने वाहिनीमध्ये अडकलेला गॅस हवेत सोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ही गळती लागली होती. अचानकपणे सीएनजीच्या सिलिंरला गळती लागल्याने गोंधळ माजला. परिस्थितीचे गंभीर्य ओळखून ताबडतोब मडगाव अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. सीएनजीच्या सिलिंडरचा स्फोट होण्याची शक्यता असल्याने तसेच जवळच पेट्रोलपंप होता, त्यामुळे संभाव्य धोका ओळखुन गाडीचे इंजीन बंद करण्यात आले. यानंतर सदर गाडी तशीच ढकलून पेट्रोलपंपा पासून दूर नेण्यात आली. सीएनजीचे सिलिंडर हाताळणे धोकादायक होते. त्यामुळे अग्निशमन दलाकडून सदर कंपनीच्या सीएनजी तज्ञांना पाचारण करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news