

पणजी : मांडवी पुलाच्या डेक स्लॅबच्या नियमित तपासणीसाठी नवीन व जुना मांडवी पूल ११ जानेवारीला तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याने काढला आहे.
रविवार, ११ जानेवारी २०२६ रोजी नवीन मांडवी पूल सकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत, तर जुना मांडवी पूल सकाळी ७.३० ते ९.०० या वेळेत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. या कालावधीत पुलांवरून वाहतूक पूर्णतः रोखण्यात येईल. तपासणी पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.