.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पणजी : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र विधानसभेच्या येत्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची महायुती पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेवर येणार आहे अशी प्रतिक्रिया गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केली. (Vishwajit Rane)
आज (सोमवार) पणजीत एका कार्यक्रमानंतर त्यांना महाराष्ट्रातील प्रचार दौऱ्याबाबत आणि निवडणुकीबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, पक्षाने आपणाला जो आदेश दिला आहे त्यानुसार आपण महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी जात आहे. आतापर्यंत अनेक बैठकाही आपण घेतलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी भरीव योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रासाठी अनेक योजना जाहीर करून त्यांची अंमलबजावणी केलेली आहे. महायुतीच्या सरकार काळात महाराष्ट्राचा भरीव विकास झालेला आहे. Vishwajit Rane
केंद्रामध्ये असलेले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकार यामुळेच महाराष्ट्राचा विकास होत आहे आणि होणार आहे. याची जाणीव महाराष्ट्रातील मतदारांना आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील मतदार महायुतीला पूर्ण बहुमत देतील असे मंत्री राणे म्हणाले. आपण आपल्याला नेमून दिलेल्या विविध मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी जाऊन आलो आहे. आता पुन्हा जाणार आहे असे राणे म्हणाले.