Land Grab Case Goa | राजकीय हेतूने फसवले, आमदारांच्या नोटा बदलल्या! जमीन हडप प्रकरणातील आरोपी सिद्दिकी खानचा दावा

Land Grab Case Goa | आमदार व खासदारांच्या संपर्कात असल्याचा सिद्दिकीचा दावा
Land Acquisition
Land AcquisitionPudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

वादग्रस्त जमीन हडप प्रकरणातील आरोपी सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याने त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली प्रकरणे राजकीय हेतूने प्रेरित असून आमदार व खासदारांच्या संपर्कात असता आपला वापर करून घेतल्याचा दावा केला आहे. तिसऱ्या जमीन हडप प्रकरणात जामीन मंजूर करताना विशेष जमीन हडप न्यायालयासमोर सिद्दिकीने दावे करून खळबळ उडवली आहे.

Land Acquisition
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

न्यायालयासमोर केलेल्या निवेदनानुसार, गेल्या अनेक वर्षांत सिद्दिकीचे अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांशी संपर्क होते. यापैकी काही जण त्याचे मित्र होते, तर काही जण राजकीय विरोधक असल्याचा दावा त्याने केला.

२०१६ मध्ये केंद्र सरकारने नोटाबंदी जाहीर केल्यानंतर जुन्या ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आपण हैदराबादमध्ये मध्यस्थ म्हणून काम केल्याचा दावाही सिद्दिकीने केला. या नोटा काही आमदार, मंत्री आणि इतर राजकीय व्यक्तींच्या असल्याचे त्याने न्यायालयात सांगून त्याने खळबळ उडवून दिली आहे.

या नोटाबंदीच्या काळात काही व्यक्तींनी आपल्याकडून जबरदस्तीने पैसे घेतल्याचा आरोपही त्याने केला. त्यानंतर स्थानिक मंत्र्यांनी आपल्याविरुद्ध दोन प्रकरणे दाखल केली होती. दिल्ली आणि पुणे येथील काही आमदारांनीही आपल्याविरुद्ध खोटी प्रकरणे दाखल केल्याचे सिद्दिकीने न्यायालयात जामिनाच्या अर्जात म्हटले आहे.

त्याच्याविरुद्ध सुरू असलेली कायदेशीर कारवाई ही राजकीय वैमनस्यातून करण्यात आल्याचा त्याचा दावा आहे. दरम्यान, सिद्दिकीविरुद्ध जमीन हडप प्रकरणांमध्ये तपास सुरू असून, त्याने न्यायालयासमोर केलेले आरोप हे त्याचे दावे आहेत.

Land Acquisition
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झाल्याचे या प्रकरणातील उपलब्ध माहितीत नमूद नाही. त्याच्याविरुद्ध जमीन हडपप्रकरणाची चार, कोठडीतून पलायनप्रकरणी तसेच मनी लाँडरिंगप्रकरणी प्रकरण दाखल आहे.

जमीन हडपप्रकरणी तसेच कोठडीतील पलायनप्रकरणी त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्याने त्याला जामीन मिळालेला आहे. मनी लाँडरिंगप्रकरणी त्याला जामीन न मिळाल्याने तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news