Kumbharjua Sangadotsav | कुंभारजुवे येथील सांगडोत्सव उत्साहात

Kumbharjua Sangadotsav | जलचित्र स्पर्धेत 'टीम ४५' ने पटकावले प्रथम पारितोषिक
Kumbharjua Sangadotsav
Kumbharjua Sangadotsav
Published on
Updated on

माशेल : पुढारी वृत्तसेवा
सुमारे दीडशे वर्षांहून अधिक परंपरा लाभलेला श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीचा प्रसिद्ध सांगडोत्सव गणेश चतुर्थीच्या सातव्या दिवशी रविवारी सायंकाळी ४:३० वाजता मांडवी नदीच्या पात्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Kumbharjua Sangadotsav
Chikhal Kalo Marcel Ponda | "माशेल आणि फोंड्यात पारंपरिक चिखलकाला सोहळा उत्साहात संपन्न! 'जय हरी विठ्ठल'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला"

कुंभारजुवेतील युवकांनी शेकडो वर्षांची ही पारंपारिक सांस्कृतिक परंपरा आपल्या खांद्यावर घेत पुढे नेली आहे. सांगडोत्सवाच्या माध्यमातून युवकांना आपली कला व कौशल्ये सादर करण्याची संधी मिळते. या उत्सवाच्या आयोजनात श्री शांतादुर्गा देवस्थान, श्रीराम देवस्थान, स्थानिक पंचायत, ज्येष्ठ नागरिक तसेच जाणकार मंडळींचे वेळोवेळी योगदान लाभत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

कुंभारजुवेचा सांगडोत्सव आज जगभर पोहोचला आहे. देवीच्या या पारंपारिक सांगडोत्सवाची कीर्ती यापुढेही अबाधित राहावी, यासाठी आपण स्वतः तसेच सरकारच्या वतीने आवश्यक ते प्रयत्न करत राहू, त्यासाठी स्थानिकांच्या इच्छा व मागण्या आपल्यापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन आमदार राजेश फळदेसाई यांनी केले.

ते कुंभारजुवे येथे सांगडोत्सवाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सरपंच विंदा जोशी, उपसरपंच सुधीर फडते, श्री शांतादुर्गा देवस्थानचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शेट, श्रीराम देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर फडते, अग्निशमन दलाचे संचालक डॉ. नितीन रायकर, पंच सदस्य सुरेंद्र नाईक, नंदकुमार शेट, सचिन गावडे, शेजल नार्वेकर, अर्चना परब आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. शिवाजी शेट यांनी यावेळी सांगडोत्सवाचा इतिहास उपस्थितांना सांगितला, तसेच डॉ. नितीन रायकर, सरपंच विंदा जोशी, पंच सदस्य नंदकुमार शेट आणि सुरेंद्र नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.

Kumbharjua Sangadotsav
Chikhal Kalo Marcel Ponda | "माशेल आणि फोंड्यात पारंपरिक चिखलकाला सोहळा उत्साहात संपन्न! 'जय हरी विठ्ठल'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला"

दरम्यान, जल चित्ररथ स्पर्धेत 'टीम ४५' या पथकाने आकर्षक चषकासह १ लाख १० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. सार्वजनिक सरस्वती मंडळ, गोळवाडा यांनी ७० हजार रुपयांचे द्वितीय, तर पॅट्रिक ग्रुप, रामभुवन वाडा यांनी ५० हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळवले. उत्तेजनार्थ २० हजार रुपयांची तीन पारितोषिके ज्ञानगीत कला मंडळ, साईगुरू कला मंडळ आणि युथ ऑफ चिंचेश्वर यांना देण्यात आली.

Kumbharjua Sangadotsav
Goa Politics | गोव्यात नवा राजकीय भूकंप? 'आप'ची साथ सोडून गोवा फॉरवर्ड पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर!

उत्साहात सांगता

दरम्यान, गणेश चतुर्थीच्या सातव्या दिवशी सकाळी मंगलमूर्तीची आरती आणि दुपारी नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर दुपारी ३ वाजता भिंगी कुटुंबीयांनी घुमट आरती सादर केली. सायंकाळी ४:३० वाजता मंगलमूर्तीला पालखीतून ढोल-ताशांच्या गजरात तारीवाडा, माशेल येथे आणण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या होडीच्या सांगडात मंगलमूर्ती विराजमान करण्यात आली आणि नदीच्या पात्रात पारंपरिक फेऱ्या मारण्यात आल्या.

यावेळी स्थानिक उत्साही कलाकारांनी होडीच्या सांगडावर पौराणिक, ऐतिहासिक, काल्पनिक तसेच सामाजिक विषयांवरील आकर्षक देखावे सादर केले. पारंपरिक फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर श्री शांतादुर्गा देवीच्या मंगलमूर्तीचे डॉ. शिवाजी शेट यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आले. त्यानंतर उत्सवाची सांगता झाली. हा प्रसिद्ध सांगडोत्सव पाहण्यासाठी गोव्यातील तसेच गोव्याबाहेरील हजारो भाविक व पर्यटकांनी आवर्जून उपस्थिती लावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news