Regional cinema IFFI | कोकणी 'पूर्णता'च्या माध्यमातून युवा दिग्दर्शकाने वेधले लक्ष

regional cinema IFFI- कोकणी 'पूर्णता'च्या माध्यमातून युवा दिग्दर्शकाने वेधले लक्ष
Regional cinema IFFI
पणजी : रेडकार्पेटवर 'पूर्णता' या कोकणी लघुपटातील कलाकारांसोबत ईएसजीच्या उपाध्यक्ष आमदार डिलायला लोबो, कार्यकारिणी सदस्य शर्मद रायतूरकर व इतर.
Published on: 
Updated on: 

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर

जाई (जायो) च्या फुलांच्या गजऱ्यांना व हारांना गोव्यात चांगली मागणी आहे. त्याचा सुगंध सर्वांचेच मनमोहून घेतो. अशा जाईच्या (जायो) फुलाभोवती फिरणारा 'पूर्णता' हा कोकणी २४ मिनिटांचा लघुपट इफ्फीत सोमवारी दाखवण्यात आला.

श्रवण काणकोणकर या विशीतील युवकांने लिहिलेला व दिग्दर्शित केलेला हा लघुपट आहे. काणकोणकर यांचा पहिलाच लघुपट असतानाही तो दर्जेदार झाला आहे. जाईच्या हार वेगवेगळ्या जीवनातून प्रवास करते, सुख-दुःखाचे क्षण वाटून घेते, दिलासा, आशा आणि आनंद देते. दिवसेंदिवस फुले हळूहळू कोमेजतात,

तरीही जीवन सुंदर बनवत राहतात. हा प्रवास कधीच संपत नाही, एक जीवन संपले तरी, दुसरे त्याचे उद्दिष्ट पूर्ण करत राहते. असा संदेश या लघुपटातून रसिकांना मिळतो. या लघुपटात सौरभ कारखानीस, संगीता मापारी, ऋषिकेश सावंत, निधी नाईक शिरोडकर, अनिश्का खांडेपारकर, डॉ. आकाश नाईक साळगावकर, शिदेश कुंडईकर गौतम काणकोणकर आदींच्या भूमिका आहेत. लघुपट प्रदर्शनापूर्वी पूर्णताच्या सर्व टीमला रेड कार्पेटचा सन्मान देण्यात आला.

यावेळी ईएसजीच्या उपाध्यक्ष आमदार डिलायला लोबो, कार्यकार्णी सदस्य शर्मद रायतूरकर आदी उपस्थित होते. त्यानंतर थियेटरमध्ये लघुपटाच्या प्रदर्शनापूर्वी पूर्णताचे दिग्दर्शक श्रवण काणकोणकर यांचा सन्मान आमदार लोबो यांनी केला. लोबो म्हणाल्या की, तरुण वयात लघुपट लिहीणे व तो दिग्दर्शित करणे आणि तो ईफ्फीत दाखवला जाणे ही श्रवण काणकोणकर तसेच आहे. आमच्यासाठी ही आनंदाची बाब चित्रपट नेहमीच कथा सांगत असतो.

श्रवण याने युवा मनाने मंदिरातील बारकावे पाहिले व त्याची कथा केली आणि लघुपट बनवला ही त्यांच्या पुढील यशाची नांदी आहे, असे शर्मद रायतूरकर म्हणाले. एका मंदिरात आपण गेलो असता जाईच्या फुलांचा हार पाहून जे सुचले त्यावर 'पूर्णता' लघुपट लिहिला, असे श्रवण काणकोणकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.