

पणजी : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे (Konkan Railway) प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावर गाडी क्रमांक 01151 / 01152 सीएसएमटी- करमळी- सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) रेल्वेगाडी धावणार आहे. गाडी क्रमांक 01151 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी विशेष (साप्ताहिक) 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर गुरुवारी सीएसएमटीहून रात्री 12 :20 वाजता सुटेल. ही रेल्वेगाडी त्याच दिवशी दुपारी 1:30 पर्यंत करमळी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01152 करमळी ते सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) वरील रेल्वेच्या निर्धारित दिवसांमध्ये धावणार आहे. दर गुरुवारी दुपारी 1: 15 वाजता ती करमळीवरून निघेल आणि ही रेल्वेगाडी दुसर्या दिवशी रात्री 3: 45 वाजता सीएसएमटीला पोहोचेल. वरील दोन्ही गाड्या 22 डब्यांच्या असणार आहेत.
गाडी क्रमांक 01129 लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी विशेष (साप्ताहिक) ही विशेष रेल्वेगाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमळी दरम्यान 10 एप्रिल ते 5 जूनपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनसमधून रात्री 10:15 ला सुटेल.