Christmas Special Trains | ख्रिसमस आणि न्यू इयरला प्रवाशांच्या सोयीसाठी धावणार रेल्वेकडून विशेष गाड्या

Christmas Special Trains | कोकण रेल्वेचे आयोजन; प्रवाशांना लाभ घेण्याचे केले आवाहन
Trains
Trains
Published on
Updated on

सासष्टी : पुढारी वृत्तसेवा

कोकण रेल्वे महामंडळाने नाताळाचा सण ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण पश्चिम रेल्वेच्या समन्वयाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Trains
South Goa Nightclubs | हडफडे आगप्रकरणानंतर प्रशासनाची कडक पावले; दक्षिण गोव्यात स्पार्कलर्स, फ्लेम, स्मोकवर बंदी

१) ट्रेन क्रमांक ०६५०५ / ०६५०६ — यशवंतपूर–वास्को–बेंगळुरू कॅन्ट स्पेशल

ट्रेन क्रमांक ०६५०५ — यशवंतपूर ते वास्को द गामा
ही स्पेशल गाडी २५ डिसेंबर (गुरुवार) आणि ३१ डिसेंबर २०२५ रोजी यशवंतपूर जंक्शनहून सुटेल.
निर्गमनानंतर गाडी पुढील स्टेशनांवर थांबेल:
चिकबनावर, तुमकुरू, आर्सिकेरे जंक्शन, दावणगेरे, हवेरी, एसएसएस हुबळी जंक्शन, धारवाड, अलनावर जंक्शन, लोंडा जंक्शन, कॅसल रॉक, कुळे, सावर्डे, संवोर्देम आणि मडगाव जंक्शन.

ही गाडी त्याच दिवशी दुपारी १:५० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०६५०६ — वास्को द गामा ते बेंगळुरू कॅन्ट
ही परतीची गाडी २५ डिसेंबर आणि १ जानेवारी २०२६ रोजी वास्कोहून सायं. ५ वाजता सुटेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता बेंगळुरू कॅन्ट येथे आगमन होईल.
थांबे: मडगाव जंक्शन, सावर्डे, कुळे, कॅसल रॉक, लोंडा, अलनावर, धारवाड, हुबळी, हवेरी, दावणगेरे, आर्सिकेरे, तुमकुरू आणि सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल.

कोच रचना (०६५०५/०६५०६):
एकूण १८ कोच —

  • फर्स्ट AC : 01

  • AC 2-tier : 01

  • AC 3-tier : 03

  • Sleeper : 07

  • General : 04

  • SLR : 02

Trains
Ponda Accident | चालक खाली उतरताच ट्रक झाला न्यूट्रल; फर्मागुडीमध्ये मालवाहू ट्रकचा अपघात

२) ट्रेन क्रमांक ०६५११ / ०६५१२ — बेंगळुरू कॅन्ट–वास्को–बेंगळुरू कॅन्ट स्पेशल

ट्रेन क्रमांक ०६५११ — बेंगळुरू कॅन्ट ते वास्को द गामा
ही स्पेशल ट्रेन २६ डिसेंबर २०२५ (शुक्रवार) रोजी रात्री ११:३५ वाजता निघेल.
दुसऱ्या दिवशी दुपारी १:५० वाजता वास्को येथे पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०६५१२ — वास्को ते बेंगळुरू कॅन्ट
परतीची गाडी २८ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी सायं. ५ वाजता वास्कोहून सुटेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता बेंगळुरू कॅन्ट येथे आगमन.

थांबे:
सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू, चिकबनावर, तुमकुरू, आर्सिकेरे, दावणगेरे, हवेरी, हुबळी, धारवाड, अलनावर, लोंडा, कॅसल रॉक, कुळे, मडगाव जंक्शन.

कोच रचना (०६५११/०६५१२):
एकूण १८ कोच —

  • फर्स्ट AC : 01

  • AC 2-tier : 01

  • AC 3-tier : 03

  • Sleeper : 07

  • General : 04

  • SLR : 02

रेल्वे प्रशासनाने ख्रिसमस आणि नववर्ष काळातील अतिरिक्त प्रवासी मागणी लक्षात घेऊन या विशेष सेवा सुरू केल्या आहेत. कोकण–गोवा पट्ट्यात पर्यटनासाठी मोठी गर्दी होत असल्याने या गाड्या प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार आहेत. प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करून सुरक्षित प्रवासाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news