

म्हापसा : टॅटू व्यवसायातील वादातून खोब्रावाडा-कळंगुट येथे एकावर चाकू हल्ला करण्याचा प्रकार शनिवारी रात्री झाला. या हल्ल्यात वरुण लमाणी (रा. कर्नाटक) हा गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य संशयित आकाश लमाणी व त्याचे साथीदार या घटनेनंतर घटनास्थळावरून पळून गेले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. वरुण व आकाश यांनी टिटो लेन परिसरात टॅटू गोंदवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायावरून त्या दोघांमध्ये यापूर्वी भांडण झाले होते. शनिवारीही दोघांमध्ये वाद झाला. या वादातून आकाशने वरुणवर चाकूने हल्ला केला. यात वरुण गंभीर जखमी झाला.