

केरी : सर्पमित्र विराज नाईक यांनी गुरुवार, दि.19 रोजी केरी-सत्तरीच्या सीमेलगत असलेल्या विर्डी दोडामार्ग येथे सुमारे 3 मीटर लांबीचा किंग कोब्रा पकडून दोडामार्ग महाराष्ट्र वन खात्याच्या स्वाधीन केला.
विर्डी येथे किंग कोब्रा असल्याची माहिती साहिल गावस याने विराजला दिल्यानंतर विराजने तो पकडला. विराज याने महिन्यापूर्वी केरी-सत्तरी येथे विराजने 2.5 मीटर लांबीचा किंग कोब्रा पकडला होता. त्याने अनेक किंग कोब्रा व साप पकडले आहेत.