Goa Kadamba Bus Strike | महामंडळ अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर कदम कर्मचाऱ्यांकडून संप मागे

आपल्या विविध मागण्यांसाठी कदम महामंडळ कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप व्यवस्थापनासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे.
Kadamba bus
Kadamba bus
Published on: 
Updated on: 

पणजी (पुढारी वृत्तसेवा):

आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कदम महामंडळ कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (दि. १२) २४ तासांसाठी पुकारलेला संप मंगळवारी मागे घेतला. कदम महामंडळ व्यवस्थापनासोबत कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाल्याची माहिती आयटकचे कामगार नेते क्रिस्टोफर फोन्सेका यांनी दिली.

Kadamba bus
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

बैठकीला कदम महामंडळाचे अधिकारी, कामगार नेते फोन्सेका, आयटक सरचिटणीस ॲड. सुहास नाईक व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बहुतेक मागण्या मान्य करण्याचे आश्वासन कदम व्यवस्थापनाने दिले.

त्यानुसार कर्मचाऱ्यांनी ते मान्य करून त्यासंबंधित करारावर सह्यादेखील केल्या. नवीन इलेक्ट्रॉनिक तिकीट यंत्रणा (ईटीएम) मागे घेणे, ३४ महिन्यांची सातव्या वेतन आयोगाची थकीत बाकी, १६ वर्षांची भविष्य निर्वाह निधीची थकीत बाकी, बदली चालक-वाहकांचे सेवेत नियमितीकरण, तसेच तिकीट तपासनीस व एटीटी पदावरील अंतर्गत बढती, प्रवाशांच्या सोयीसाठी ३५० नवीन डिझेल बस खरेदी करण्याची मागणीही संघटनेने केली आहे.

Kadamba bus
Panaji shopkeepers fire safety demand|पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका

दरम्यान, कदम महामंडळ वाहतूक कर्मचाऱ्यांनी गुरुवारी, १२ रोजी मध्यरात्रीपासून संपार जाण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 'एस्मा' लागू केला होता. या संपत सहभागी होणाऱ्यांवर अत्यावश्यक सेवा कायद्याखाली कारवाई करण्याचा इशारा दिला होता. हा एस्मा पुढील सहा महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे. त्यानुसार रस्ता किंवा जलमार्गे प्रवासी वाहतूक अथवा मालवाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना तो लागू होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.