

पणजी : गोवा विद्यापीठातील फ्रॉलिक या सांस्कृतिक कार्यक्रमात घडलेल्या घटनेची अंतर्गत चौकशी सुरू आहे. याचा अहवाल लवकरच सादर करण्यात येईल. या कार्यक्रमाची फ्रॉलिक हा सांस्कृतिक कार्यक्रम विद्यापीठाच्या परवानगीशिवाय आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती कुलगुरू प्राध्यापक हरीलाल मेनन यांनी दिली आहे.
कुलगुरू प्रा. हरीलाल मेनन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थिनींचाही समावेश होता. काही विद्यार्थिनींनी तक्रार केल्यानंतर या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अंतर्गत समितीतर्फे चौकशी सुरू असून त्याचा अहवाल सादर केल्यानंतर, तो कार्यकारी परिषदेच्या बैठकीसमोर ठेवला जाईल. त्यानंतर या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल.
सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर एनएसयूआय अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी विद्यापीठाचे या प्रकरणाची तसेच इतर महत्त्वाच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी टास्क फोर्स नेमण्याची मागणी केली आहे.