Calangute Robbery | कळंगुटमधील खळबळजनक घरफोडीप्रकरणी आंतरराज्यीय 'पारधी गँग'चा पर्दाफाश; मध्य प्रदेशातून तिघे जेरबंद

Calangute Robbery | मध्य प्रदेशातून तिघा संशयितांना अटक; सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहितीद्वारे काढला माग
Calangute Robbery
Calangute Robbery
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
कळंगुट येथील विलामध्ये घुसून रहिवाशांना धमकावत मारहाण करून रोकड लुटीच्याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी आंतरराज्यीय 'पारधी गँग'च्या तिघांना मध्य प्रदेशातून अटक केली. मध्य प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आली.

Calangute Robbery
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

९ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.४० च्या सुमारास कळंगुटमधील ऑर्चर्ड विलेज येथील विला क्रमांक ३७ मध्ये चार अज्ञात व्यक्तींनी स्वयंपाकघरच्या खिदकीतून प्रवेश केला होता. चेहऱ्यावर कपडे बांधलेल्या या संशयितांकडे स्क्रू ड्रायव्हर, चाकू आणि गोफण होती. त्यांनी विलामधील रहिवाशांना धमकावत मारहाण केली आणि रोकड घेऊन पलायन केले होते.

या घटनेनंतर कळंगुट पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधाराने तपास सुरू केला. संशयित मध्य प्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक राजाराम बासकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक मध्य प्रदेशात रवाना करण्यात आले.

शिवपुरी जिल्ह्यातील सतनवाडा पोलिसांच्या मदतीने हरिचंद रतनलाल मोगिया आदिवासी (३७) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळ मोंगिया (४५) आणि अरुण मोंगिया (१८) या अन्य दोघांना अशोकनगर जिल्ह्यातील कुपवाई येथून अटक करण्यात आली. तिघांनीही गुन्ह्यात सहभाग असल्याचे कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर करून ट्रांझिट रिमांड मिळवण्यात आला. त्यानंतर त्यांना गोण्यात आणण्यात आले आहे.

Calangute Robbery
Panaji shopkeepers fire safety demand|पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका

हे तिघे आंतरराज्यीय 'पारधी गँग'शी संबंधित असून, विविध राज्यांमध्ये संघटित घरफोडी व मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा संशय आहे. लुटलेली रोकड हस्तगत करणे, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे शोधणे, प्रत्येक आरोपीची भूमिका निश्चित करणे आणि अन्य गुन्ह्यांतील सहभाग तपासणे यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे. कळंगुटचे पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बासकर, पोलिस उपनिरीक्षक स्नेहल मलिक यांच्यासह कळंगुट पोलिस पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.