पणजी : पुढारी वृत्तसेवा : वेगवेगळ्या कारणांमधून सतत वादाच्या भोवर्यात सापडणार्या गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात एका अंडरट्रायल कैदी राजू दास याने स्वत:ला पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे कोळवाळ कारागृहाचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलवाळ कारागृहात एका अंडरट्रायल कैद्याने स्वतःला पेटवून घेतले. त्यानंतर त्याने स्वत:ला कारागृहातील दवाखान्यातच कोंडून घेतले. तो सुमारे 40 टक्के भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला गोमेकॉच्या इस्पितळात दाखल केले आहे. तुरुंगात त्याचा छळ होत असल्याने त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे.