

उन्हाळ्याची चाहूल लागताच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून पाणीटंचाईच्या भीषण बातम्या कानावर पडू लागतात. कोरड्या पडलेल्या विहिरी, खालावलेली भूजल पातळी आणि पाण्यासाठी ग्रामस्थ वणवण भटकण्याचे विदारक दृश्य हे आता केवळ एका ऋतूपुरते मर्यादित राहिलेले नाही. टँकरवर अवलंबून असणारे जीवन आणि हंडाभर पाण्यासाठी कडक उन्हात तासणतास उभे राहावे लागणे, ही बाब आपल्या विकासामांकाच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करते.
जगतिक स्तरावरील अनेक निसर्गप्रेमी, पर्यावरणतज्ज्ञ आणि भविष्यवेत्त्यांनी मानवजातीला एक अत्यंत गंभीर इशारा दिला आहे, जगातील पुढील म्हणजेच तिसरे महायुद्ध हे जमिनीसाठी, सोन्यासाठी किंवा खनिज तेलासाठी नव्हे, तर पिण्याच्या पाण्याच्या थेंबाथेंबासाठी लढले जाईल.
ही केवळ काल्पनिक भीती किंवा एखादी कथा नसून ती आपल्या दारात येऊन ठेपलेली भयानक वास्तविकता आहे. निसर्गाने आपल्याला पाणी ही अमूल्य देणगी म्हणून दिली आहे, परंतु त्याचा वापर अमर्याद आणि बेजबाबदारपणे केला आहे. पाणी ही केवळ एक उपभोग्य वस्तू नसून तिचे संरक्षण आणि योग्य व्यवस्थापन करणे ही मानवाची नैतिक जबाबदारी आहे.
जलसंकटाची तीव्रता दिवसांदिवस वाढण्यामागे निसर्गापेक्षा मानवाच्या कृती जास्त कारणीभूत आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी शहरांचा विस्तार होत असून सिमेंट-काँक्रीटची जंगले उभारल्यामुळे जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता कमालीची घटली आहे. त्याशिवाय औद्योगिक क्रांती आणि शहरीकरणामुळे उगवणाऱ्या रासायनिक सांडपाण्याचा आणि कचऱ्याचा निचरा नद्या, तलाव आणि भूगर्भातील साठ्यांमध्ये केल्याने उरलेले स्वच्छ पाणीही विषारी आणि पिण्यास अयोग्य बनत चालले आहे.
शेतीसाठी आणि बोअरवेलच्या माध्यमातून भूलाचा अमर्याद उपसा केला जात असल्याने विहिरी व बोअरवेल कोरड्या पडत आहेत. त्यातच भर म्हणून हवामानामुळे पावसाचे चक्र अनियमित झाले असून कधी अतिवृष्टी तर कधी तीव्र दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या जागतिक जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर, निसर्गाने मुबलक पाऊस दिलेला गोव्यासारख्या पर्यटनराज्यातही गंभीर जलसंकटाची चाहूल लागली आहे. मुसळधार पाऊस, खळाळून वाहणाऱ्या नद्या आणि निसर्गरम्य समुद्रकिनारे लाभलेले गोवा राज्य पर्यटनसाठी जगभर प्रसिद्ध असले, तरी या सुंदर निसर्गाच्या पडद्यामागे पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्न एरणीवर आला आहे.
अनियंत्रित शहरीकरण, गृहप्रकल्प आणि रिसॉर्ट्स यांच्या बांधकामामुळे गोव्याची दैनिक पाण्याची गरज सुमारे ७०० दललतक लीटरपर्यंत पोहोचली आहे. वर्षाकाठी येणाऱ्या लाखो पर्यटकांच्या अतिरिक्त ताण, बोअरवेलच्या अतिउपशांमुळे गोड्या पाण्यात समुद्राचे खारे पाणी शिरण्याचा धोका, मांडवी व जुहारी नद्यांचे वाढते प्रदूषण आणि योग्य नियोजनाभावी पावसाचे पाणी समुद्राला मिळणे यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
पाण्याच्या या तानामुळे जुन्या विहिरी, बारव व तलावांचे पुनरुज्जीवन करणे आणि खाण-खंदकांतील पाण्याच्या पुनर्वापर करणे यासारख्या आपत्कालीन योजना राबवण्याची वेळ आली आहे. निसर्गाने दिलेल्या पाण्याचा योग्य नियोजन करण्यात मानव पूर्णपणे अपयशी ठरला आहे. घरगुती वापरादरम्यान नळ उघडे ठेवणे, गाड्या धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणे आणि पाइपलाइनमधील गळतीकडे दुर्लक्ष करणे या दैनिक चुका आपण वारंवार करतो.
तसेच आपल्या पूर्वजांनी अत्यंत वैज्ञानिक दृष्टीने बांधलेले पारंपरिक जलस्रोत आज कचऱ्याचे डेपो बनले असून त्यांच्या दुरुस्तीमुळे आपण पाण्याचे नैसर्गिक साठे गवावून बसलो आहोत. पाण्याचे हे संकट केवळ तहान भागवण्यापुरते मर्यादित राहिलेले नसून नद्यांच्या पाणीवाटपावरून दोन राज्यांमध्ये किंवा गावांमध्ये तीव्र वाद निर्माण होत आहेत, जे भविष्यातील मोठ्या युद्धांची नांदी ठरत आहेत.
या भीषण संकटातून मार्ग काढायचा असेल तर आपल्याला त्वरित आणि ठोस पावले उचावली लागतील. प्रत्येक खाजगी व सरकारी इमारतीत पावसाचे पाणी साठवण्यासाठी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रणाली अनिवार्य केली पाहिजे. बोअरवेल, विहिरी आणि शोषहूण्र्यांच्या माध्यमातून भूलाची पातळी वाढवली पाहिजे.
गोव्यासारख्या ठिकाणी पारंपरिक जलसोतांचे पुनरुज्जीवन करणे, शेतीत ठिबक व तुषार सिंचन वापरणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योगांसाठी पुन्हा वापरण्यायोग्य बनवणे बंधनकारक केले पाहिजे. तसेच शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पाणी बचतीची शिकवण देऊन ती एक लोकचळवळ बनवली पाहिजे.
पाणी म्हणजेच निसर्गाने दिलेला वरदान आहे. पाणी हा असा घटक आहे, जो आपल्याला प्रयोगशालात कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. पाणी वाचवणे आणि त्याचा पुनर्वापर करणे पूर्णपणे आपल्या हातातात आहे. निसर्गाने आपल्याला मुबलक पाणी दिले आहे, आता योग्य व्यवस्थापन करून ते भविष्यातील पिढीसाठी टिकवून ठेवणे ही आपली नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. जर आपण आज पाण्याचा प्रत्येक थेंब जपला, तरच उद्याचे भविष्य सुरक्षित राहीलि आणि गोव्यासारखा नंदनवन तसेच संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धासारख्या भीषण जलसंकटापासून आपण वाचवू शकू.
शेतीसाठी आणि बोअरवेलच्या माध्यमातून भूजलाचा अमर्याद उपसा केला जात असल्याने विहिरी व बोअरवेल कोरड्या पडत आहेत. त्यातच भर म्हणून हवामानामुळे पावसाचे चक्र अनियमित झाले असून कधी अतिवृष्टी तर कधी तीव्र दुष्काळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.