

पेडणे : पुढारी वृत्तसेवा
पेडणे तालुक्यातील पर्यटन हंगामात देश विदेशातील येणाऱ्या पर्यटकांचे जय्यत स्वागत करण्यासह त्यांच्या मनोरंजनासाठी संगीत रजनीच्या पाट्यां मोरजी, हरमल, आश्वे-मांद्रे या किनारी भागात आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आणि त्या पाटांचे फलक मुख्य रस्त्यांच्या जंक्शनवर कोपऱ्या कोपऱ्यात अतिक्रमण करून लावले आहेत.
मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नूतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देश-विदेशातील लाखो पर्यटक किनारी भागात येत असतात. मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत रस्त्यावरही वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे एखाद्याला तत्काळ कुठे नियोजित स्थळी जायचे असेल, तर तासनतास रस्त्यावरच त्याला थांबवावे लागते आणि या कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ट्रॅफिक पोलिस कार्यरत असतात; परंतु नियंत्रण मिळवताना अनेक अडचणी येतात.
मांद्रे पोलिसावर ताण मांद्रे पोलिस स्टेशनवर सध्या पोलिसांची कमतरता असल्यामुळे ३० ते ३५ सध्या मद्रि पोलिस स्टेशनवर पोलिस आहेत. शिवाय, खास पोलिस पथकही किनारी भागात तैनात केलेले आहेत. सध्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक येतात. त्यामुळे किनाऱ्यावर पोलिसांची तैनाती आकडा अधिक ठेवला जाणार आहे.
शिवाय चर्च परिसरातही पोलिस तैनात असतात, त्या भागात पेट्रोलिंग करत असताना पोलिस निरीक्षक दुचाकीने स्वतः फेरफटका पूर्ण मांद्रे मतदारसंघात मारणार आहे.बंद असलेल्या घरावरही पोलिसांचे लक्ष ठेवण्यासाठी पेट्रोलिंगचा करण्याचा उपक्रम मांद्रे पोलिसांनी पोलिस निरीक्षक गिरेंद नाईक यांच्या नेतृत्वाखाली याआधी राबवलेला आहे. शिवाय किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते वाहतूक कोंडी होत असते, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅफिक पोलिस तसेच होमगार्ड यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अडचणी निर्माण
पोलिस तैनात करणार पोलिस निरीक्षक नाईक
३१ रोजी मोठ्या प्रमाणात किनारी भागात ज्या जंगी पाट्यांचे आयोजन केले जाते, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देश-विदेशातील पर्यटक आपापली वाहने भाडेपट्टीवर वाहने घेऊन किनारी भागातील रस्त्यावरून जात असतात. अशा मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरवर्षी वाहतूक कोंडी होते. जंक्शनवर ट्रॅफिक पोलिस तैनात येणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी दिली.