illegal conversion case | बेकायदा धर्मांतर; ‘आयेशा’ला अटक

‘मिशन अस्मिता’ अंतर्गत गोव्यात कारवाई
illegal conversion case
illegal conversion case | बेकायदा धर्मांतर; ‘आयेशा’ला अटकPudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : देशभर गाजत असलेल्या बेकायदा धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी (दि. 18) सकाळी जुने गोवे येथून आयेशा ऊर्फ एस. बी. कृष्णा ऊर्फ निक्की (35 वर्षे) हिला अटक केली. ती मूळची ओडिशाची असून अनेक वर्षे गोव्यात सांतान-तळावली, सांतआंद्रे येथे भाड्याच्या घरात राहत होती. हल्लीच ती कुटुंबीयांसमवेत जुने गोवे येथील एका खासगी इस्पितळाच्या परिसरात असलेल्या इमारतीत स्थायिक झाली होती. शुक्रवारी तिला अटक केल्यानंतर तिच्या कुटुबीयांना चौकशीसाठी नेण्यात आले. तिच्यासह या कामात गुंतलेल्या इतर 10 जणांच्या देखील मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई उत्तर प्रदेश पोलिसांनी राबवलेल्या ‘मिशन अस्मिता’ या विशेष मोहिमेंंतर्गत पार पडली. आयेशा ही देशभरात धर्मांतर घडवणार्‍या एका जिहादी नेटवर्कची आर्थिक व्यवस्थापक (फंड मॅनेजर) असल्याची माहिती समोर आली आहे. युएई, अमेरिका, कॅनडा आणि लंडन येथून कोट्यवधी रुपये तिच्या खात्यांमध्ये जमा व्हायचे, जे ती भारतात विविध खात्यांत वर्ग करत होती. या रकमेचा वापर ब्रेनवॉशिंग आणि धर्मांतर मोहिमांसाठी केला जात होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कॅनडास्थित सय्यद दाऊद अहमदकडून निधी नियमितपणे आयेशाच्या खात्यात पाठवण्यात येत होता.

या रकमेचा हवालामार्फत वापर केला जात होता. सय्यद दाऊद सोशल मीडियावर जिहादी प्रचार करत व्हिडिओ तयार करत होता आणि प्रसारित करत होता. तपासात हेही उघड झाले की, आयेशाचा पती अली हसन ऊर्फ शेखर राय हा कोलकात्याचा रहिवासी असून स्थानिक न्यायालयात कर्मचारी आहे. तो या रॅकेटमध्ये ‘लिगल अ‍ॅडव्हायझर’ म्हणून कार्यरत होता. धर्मांतर प्रक्रियेतील कायदेशीर अडथळे दूर करण्याचे काम तो करायचा. या रॅकेटचे धागेदोरे लश्कर-ए-तैयबा-सारख्या दहशतवादी संघटनांशी जोडले असल्याचीही गंभीर माहिती पुढे आली आहे. या नेटवर्कमधील सर्वात धोकादायक सदस्य अल-रहमान कुरैशी (आग्रा) हा असून तो सोशल मीडियाद्वारे अल्पवयीन मुलींना धर्मांतरासाठी ब्रेनवॉश करत होता.

...असा झाला नेटवर्कचा पर्दाफाश

नेटवर्कचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी एका महिला उपनिरीक्षकामार्फत सोशल मीडियावर बनावट इंस्टाग्राम आयडीद्वारे जिहादी नेटवर्कशी संपर्क साधला. ‘डिजिटल इन्फिल्ट्रेशन’ तंत्राचा वापर करत या रॅकेटपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. मोबाईल लोकेशन्स, कॉल डिटेल्स व इंटरनेट आयडींची बारकाईने तपासणी करून ही टोळी उघडकीस आणण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news