IFFI Goa 2026 News | 'ब्रिक्स' विभागाचे आकर्षण, 100 नवोदित कलाकारांना संधी

IFFI Goa 2026 News | इफ्फीच्या तयारीची लगबग; 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' या उपक्रमाचे सहावे पर्व रंगणार
IFFI 2026 Goa
IFFI 2026 Goa
Published on: 
Updated on: 

पणजी (पुढारी वृत्तसेवा): ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) जय्यत तयारी सुरू असून, येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात हा भव्य सोहळा रंगणार आहे. यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावर 'ब्रिक्स' देशांच्या चित्रपटांवर विशेष भर देण्यात आला आहे, तर दुसरीकडे देशभरातील युवा चित्रपट निर्मात्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' या उपक्रमाचे सहावे पर्वही उत्साहात पार पडणार आहे.

IFFI 2026 Goa
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

जागतिक सिनेमाच्या मेजवानीसोबतच उदयोन्मुख भारतीय कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' हा उपक्रम पुन्हा एकदा इफ्फीमध्ये दाखल होत आहे. पूर्णपणे प्रायोजित असलेल्या या उपक्रमांतर्गत चित्रपट निर्मितीशी संबंधित १३ विविध कलाप्रकारांमधील निवडक १०० युवा प्रतिभावान कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले जाणार आहे.

निवड झालेल्या या १०० युवा कलाकारांसाठी महोत्सवादरम्यान विशेष प्रशिक्षण आणि संवादाचे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. यामध्ये तज्ज्ञांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, दिग्गजांशी संवादाची सत्रे आणि 'सीएमओटी टॅलेंट कॅम्प' यांचा समावेश आहे. याशिवाय, सहभागींच्या सर्जनशीलतेचा कस पाहणारे २४ तासांचे चित्रपट निर्मिती आव्हान (फिल्ममेकिंग चॅलेंज) हे या उपक्रमाचे मुख्य आकर्षण असेल.

IFFI 2026 Goa
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

या उपक्रमामुळे नवोदित कलाकारांना चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक, निर्माते आणि तांत्रिक तज्ज्ञांशी थेट संवाद साधता येणार आहे. आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याची आणि माध्यम व मनोरंजन क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी शोधण्याची सुवर्णसंधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. एकूणच, ५७ वा इफ्फी महोत्सव आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्कृतीचे आदानप्रदान आणि नव्या पिढीच्या सक्षमीकरणाचा अनोखा संगम ठरणार आहे.

'रामायण'ने होणार ब्रिक्स चित्रपट विभागाची सुरुवात

यंदाच्या महोत्सवात 'ब्रिक्स' राष्ट्रातील सिनेमावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या विशेष विभागाची दिमाखदार सुरुवात भारताच्या 'रामायण' या चित्रपटाने होणार आहे. महोत्सवाच्या माध्यमातून ब्रिक्स समूहातील सर्व ११ सदस्य देशांतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचे प्रदर्शन केले जाईल. याशिवाय, भागीदार देशांच्या निवडक कलाकृतींचाही यात समावेश असेल. यामुळे चित्रपट रसिकांना विविध देशांतील समृद्ध सांस्कृतिक परंपरा, सामाजिक वास्तव आणि कथाकथनाच्या वैविध्यपूर्ण शैलींचा जवळून अनुभव घेता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.