New Home Film | सात वर्षांचा तुरुंगवास अन् नव्याने आयुष्याची सुरुवात; 'न्यू होम' चित्रपटाची भावस्पर्शी कथा

New Home Film | ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'न्यू होम' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
New Home Film
New Home Film
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

तुरुंगात अनेक वर्षे घालवल्यानंतर समाजात परतणाऱ्या व्यक्तींना आयुष्य पुन्हा उभे करण्यासाठी आणि भूतकाळाचे ओझे झुगारून देण्यासाठी मूक संघर्ष करावा लागतो, असे मत रशियन चित्रपट दिग्दर्शक निकिता गृशीन यांनी व्यक्त केले.

New Home Film
Iffi Goa| सप्तरंगी इफ्फीचे पणजी कायमचे माहेरघर

५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'न्यू होम' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. १०१ मिनिटांच्या या रशियन चित्रपटाचा जागतिक प्रीमियर इफ्फी २०२६ मध्ये झाला. रशियाच्या भागीदार देश विशेष प्रदर्शन विभागात या चित्रपटाचा समावेश आहे.

प्रदीर्घ तुरुंगवासानंतर पुनर्वसन प्रक्रियेतून जाणाऱ्या अनेक व्यक्तींशी झालेल्या संवादातून चित्रपटाची प्रेरणा मिळाल्याचे गृशीन यांनी सांगितले. या व्यक्तींना समाजात पुन्हा सामावून घेताना येणाऱ्या अडचणींकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही.

New Home Film
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

गृशीन यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'न्यू होम' (नॉव्ही डोम) या चित्रपटात सात वर्षांचा तुरुंगवास भोगून बाहेर आलेल्या अॅन्नाची कथा आहे. तिच्याकडे पैसे, कुटुंब किंवा जगण्याची निश्चित दिशा नसते. एका समाजसेवी संस्थेच्या मदतीने तिला रोजगार, निवारा आणि आधार गट मिळतो.

तेथे तिची भेट रोमनशी होते. त्याच्या मदतीने आयुष्य नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करताना तिला भूतकाळातील आठवणी आणि अंतर्गत संघर्षांना सामोरे जावे लागते. अॅन्नाचे पात्र कोणत्याही एका व्यक्तीवर आधारित नसून अशा परिस्थितीचा सामना केलेल्या अनेकांच्या अनुभवांतून ते साकारल्याचे गृशीन यांनी स्पष्ट केले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरही अपराधीपणाची भावना व्यक्तींना पुढे जाण्यापासून रोखते, असेही ते म्हणाले.