IFFI 2026 | मध्ये रशियाचा खास सहभाग; चार चित्रपटांमधून उलगडणार रशियन संस्कृती

IFFI 2026 | सीमाविरहित कथा' या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आलेल्या ५७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) रशियाला प्रतिष्ठित भागीदार देश म्हणून स्थान देण्यात आले आहे.
IFFI 2026 | मध्ये रशियाचा खास सहभाग; चार चित्रपटांमधून उलगडणार रशियन संस्कृती
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

'सीमाविरहित कथा' या संकल्पनेखाली आयोजित करण्यात आलेल्या ५७व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) रशियाला प्रतिष्ठित भागीदार देश म्हणून स्थान देण्यात आले आहे. २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान गोव्यात होणाऱ्या या महोत्सवात समकालीन रशियन दिग्दर्शकांच्या संवेदनशील कलाकृती आणि सोव्हिएत काळातील एका प्रसिद्ध संगीतप्रधान चित्रपटाचा समावेश असलेले चार चित्रपटांचे विशेष पॅकेज सादर करण्यात येणार आहे.

IFFI 2026 | मध्ये रशियाचा खास सहभाग; चार चित्रपटांमधून उलगडणार रशियन संस्कृती
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

या माध्यमातून भारत आणि रशिया यांच्यातील दीर्घकालीन सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उद्योन्मुख दिग्दर्शकीय प्रतिभा आणि सोव्हिएत काळातील विडंबनात्मक संगीतप्रधान कलाकृती यांचा संगम असलेला 'भागीदार देश रशिया' हा विभाग रशियन चित्रपटसृष्टीतील भावनिक व्यापकता, शैलीतील प्रयोगशीलता आणि विषयांची सखोलता अधोरेखित करतो.

कौटुंबिक संघर्ष, सामाजिक परकेपणा आणि वैयक्तिक मुक्तीचा शोध घेणाऱ्या कथांपासून ते शोस्ताकोविच यांच्या संगीताने सजलेल्या शहरी जीवनातील आकांक्षा आणि नोकरशाहीवरील उपरोधक भाष्य करणाऱ्या चित्रपटांपर्यंत विविध विषय या निवडीत हाताळण्यात आले आहेत. या चित्रपटांमधून प्रतिनिधी आणि चित्रपटप्रेमींना मानवी भावविश्वाचा वेध घेणारा अनुभव मिळणार आहे.

अनास्तासिया कुक्षिना दिग्दर्शित 'बो बो' हा ९८ मिनिटांचा चित्रपट इफ्फीच्या माध्यमातून भारतात प्रथमच प्रदर्शित होणार आहे. ओळख, स्वीकार आणि सामाजिक पूर्वग्रह या विषयांवर भाष्य करणारा हा हृदयस्पर्शी ग्रामीण नाट्यपट आहे. चेहऱ्यावरील रक्तवाहिन्यांच्या गाठीमुळे (हेमॅन्जिओमा) उपसाला सामोरे जावे लागणाऱ्या नादिया या लहान मुलीची कथा यात मांडण्यात आली आहे.

संगीताच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करताना ती आत्मविश्वासाचा शोध घेते. बाह्य रूप बदलण्यापेक्षा सामाजिक पूर्वग्रहांवर मात करणे हेच खरे परिवर्तन असल्याचा संदेश हा चित्रपट देतो. राउल गेदारोव्ह दिग्दर्शित 'सिडनी लुमेट्स बर्थडे' हा ९२ मिनिटांचा चित्रपटही इफ्फीमध्ये भारतात प्रथमच प्रदर्शित होणार आहे.

IFFI 2026 | मध्ये रशियाचा खास सहभाग; चार चित्रपटांमधून उलगडणार रशियन संस्कृती
Panaji shopkeepers fire safety demand|पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका

वायबोर्ग राष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ग्रँड ज्युरी पुरस्काराचा मानकरी ठरलेला हा चित्रपट १७ वर्षीय दातोच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. कौटुंबिक तणाव, त्याग आणि क्षमाशीलता अशा भावनिक संघर्षातून मार्ग काढताना दातोला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जखमा भरून काढण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक ताकद आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता यांचा वेध हा चित्रपट घेतो.

निकिता गुशिन दिग्दर्शित 'न्यू होम' हा १०१ मिनिटांचा चित्रपट इफ्फी २०२६ मध्ये जागतिक स्तरावर प्रथमच प्रदर्शित होणार आहे. दुसरी संधी आणि आयुष्याला नव्याने सुरुवात करण्याच्या संघर्षांवर आधारित हा भावस्पर्शी चित्रपट आहे. सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर ॲना आपले आयुष्य पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करते. यासाठी तिला सामाजिक सेवा आणि रोमन यांच्या पाठिंब्याची मदत मिळते. हा चित्रपट समाजातील विविध आव्हाने मांडतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.