IFFI 2026 मध्ये पर्यावरणाचा जागर; 'मिशन लाइफ' विभागात पाच आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी

IFFI 2026 | यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) राष्ट्रीय कथाकथनाच्या गौरवसोहळ्याला पूरक ठरणारा 'मिशन लाइफ' हा स्वतंत्र विभागही आयोजित करण्यात आला आहे.
IFFI 2026
IFFI 2026
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) राष्ट्रीय कथाकथनाच्या गौरवसोहळ्याला पूरक ठरणारा 'मिशन लाइफ' हा स्वतंत्र विभागही आयोजित करण्यात आला आहे. या विभागात पर्यावरणीय बदल, मानव आणि मानवेतर सजीवांमधील परस्परसंबंध तसेच शाश्वत जीवनशैलीचा नव्याने विचार करण्याची गरज अधोरेखित करणाऱ्या पाच आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे.

IFFI 2026
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

या विभागात मारिया मोलिना पेड्रो दिग्दर्शित 'लाइक एनी अदर मॉर्टल' या नेदरलँड्स आणि स्पेन यांच्या सहनिर्मितीतील चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटाचा आशियातील पहिला प्रीमियर होणार आहे. माहितीपट, फ्लॅमेन्को आणि विज्ञानकथा यांचा अनोखा संगम असलेला हा चित्रपट अँडालुसियातील प्राचीन खाणकामामुळे निसर्गावर झालेल्या जखमा आणि मंगळ ग्रहावरील रोबोटिक संशोधन यांमधील साम्य उलगडतो.

इक्वेडोर, चिली आणि जर्मनी यांच्या सहनिर्मितीतून साकारलेल्या व्हॅरेनिस बेनितेझ यांच्या 'नुंकुई' या चित्रपटाचाही आशियातील पहिला प्रीमियर होणार आहे. ॲमेझॉन खोऱ्यातील शुआर समुदायातील एका तरुण मुलीची ही कथा आहे. खाणकाम करणाऱ्या कंपन्या तिच्या मातृभूमीत प्रवेश करत असताना, ती पूर्वजांची गीते, वनदेवता आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्यातून संघर्ष करण्याचे बळ मिळवते.

IFFI 2026
Panaji shopkeepers fire safety demand|पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका

नेदरलँड्स आणि इंडोनेशिया यांच्या सहनिर्मितीतून साकारलेल्या सबिन ग्रोनेवेगेन यांच्या 'द क्लिअरिंग' या चित्रपटाचा भारतातील पहिला प्रीमियर होणार आहे. संग्रहित आणि समकालीन दृश्यफितींच्या एकत्रित वापरातून हा चित्रपट सुमात्रातील वर्षावनांचे वसाहतवादी काळात रबराच्या मळ्यांमध्ये झालेल्या रूपांतराचा वेध घेतो. त्याचबरोबर शोषण आणि प्रतिकाराचा वारसा आजही कसा कायम आहे, हे अधोरेखित करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.