IFFI Goa | इफ्फीत 'आय मॅटर'चा भारतीय प्रिमियर; आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला चित्रपट गोवा महोत्सवात

IFFI Goa | रोमानिया, जर्मनी आणि बेल्जियम सहनिर्मितीचा बहुभाषिक नाट्यपट; 'मिड-फेस्ट'मध्ये होणार प्रदर्शन
IFFI Goa
IFFI Goa
Published on: 
Updated on: 

पणजी (पुढारी वृत्तसेवा):

प्रसिद्ध चित्रपट निर्माती अलिना शर्बान यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेला बहुभाषिक नाट्यपट 'आय मॅटर' ७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) 'मिड-फेस्ट' चित्रपट म्हणून भारतीय प्रिमियरसाठी सज्ज झाला आहे. रोमानिया, जर्मनी आणि बेल्जियम यांची सहनिर्मिती असलेला १०१ मिनिटांचा हा चित्रपट ओळख, कुटुंब, आपलेपणा आणि भूतकाळातील परिस्थितीवर मात करून भविष्य घडवण्याच्या संघर्षावर भाष्य करतो.

IFFI Goa
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

रोमानी आणि रोमानियन भाषांतील संवाद असलेला हा चित्रपट युरोपियन चित्रपटसृष्टीचा वेगळा दृष्टिकोन मांडतो. प्रख्यात अभिनेत्री आणि नाटककार अलिना शर्बान यांचा हा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट आहे.

बुखारेस्ट येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ थिएटर अँड फिल्मच्या पदवीधर असलेल्या अलिना यांनी न्यूयॉर्क विद्यापीठाच्या टिश स्कूल ऑफ द आर्ट्स आणि लंडनच्या रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टमध्येही प्रशिक्षण घेतले आहे. त्यांच्या आधीच्या कामांमध्ये कान चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेला 'अलोन ॲट माय वेडिंग' आणि अनेक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळवून देणारा 'जिप्सी क्वीन' यांचा समावेश आहे.

IFFI Goa
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

व्हेनिस चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेल्या 'हाउसकीपिंग फॉर बिगिनर्स' या चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. 'आय मॅटर'चा प्रिमियर सप्टेंबर २०२६ मध्ये ८३ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 'व्हेनिस स्पॉटलाईट' विभागात झाला. या चित्रपटाला प्रतिष्ठित 'आर्मानी ब्युटी ऑडियन्स अवॉर्ड' मिळाला आहे. डेनिसा फर्कास हिने रेबेकाची मुख्य भूमिका साकारली असून, सोरिन मिहाई, ॲंजेलिना पावेल, वनेसा डान्सिया, रायसा मिहाई, अलेक्झांडूक स्टँकु, अलिना बेझून्ट्याणू आणि नताशा कॅलिन यांच्या भूमिका आहेत.

इफ्फीतील 'मिड-फेस्ट' प्रस्तुती म्हणून या चित्रपटाचे प्रदर्शन २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता पर्वरी येथे एकाच वेळी होणार आहे. दिग्दर्शिका अलिना शर्बान आणि मुख्य अभिनेत्री डेनिसा फर्कास या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.