Panaji Road Closure | इफ्फीसाठी गोव्यात वाहतुकीत मोठे बदल! आयनॉक्सचा रस्ता सलग 9 दिवस बंद

Panaji Road Closure | वाहतूक पोलिसांकडून नियोजन; आयनॉक्स रस्ता नऊ दिवस बंद, पदपथांवर पार्किंगला बंदी
Panaji Road Closure
Panaji Road Closure
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पार्श्वभूमीवर पणजी आणि परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गोवा वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक व पार्किंग व्यवस्था लागू केली आहे. यानुसार आयनॉक्स येथील रस्ता सलग नऊ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून, पदपथांवर वाहन पार्क करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. २० ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत महोत्सव होणार आहे.

Panaji Road Closure
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

या काळात काही मार्गावर वाहतूक निर्बंध लागू राहतील. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून निर्धारित पार्किंगस्थळीच वाहने उभी करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. इफ्फीचा उद्घाटन आणि समारोप सोहळा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे २० आणि २८ नोव्हेंबर रोजी स्टेडियमकडे जाणाऱ्या वाहनांसाठी विशेष मार्ग निश्चित केले आहेत.

उत्तर व दक्षिण गोव्यातून पणजी वगळून येणाऱ्या वाहनांनी महामार्ग ६६ मार्गे गोमेकॉ, बांबोळी येथे पोहोचून गोवा विद्यापीठ मार्गे स्टेडियमकडे जावे. पणजी शहरातून येणाऱ्या वाहनांनी परिस्थितीनुसार ताळगाव किंवा दोनापावला मार्गाचा वापर करावा, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

महोत्सव काळात गोवा मनोरंजन संस्थेने (ईएसजी) जारी केलेल्या कार पासनुसारच निर्धारित पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करता येतील. उद्घाटन आणि समारोप सोहळ्यासाठी स्टेडियममधील अंतर्गत पार्किंग झोन ए-१, तर स्टेडियमलगत ओव्हरहेड पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या जागेत झोन ए-२ निश्चित केला आहे.

पार्किंग लॉट, आयनॉक्स पार्किंग लॉट निमंत्रितांसाठी स्टेडियमशेजारील मोकळी जागा, गोवा विद्यापीठ क्रिकेट मैदान आणि आकाशवाणी कंपाऊंड येथे पार्किंगची व्यवस्था आहे. कार पासधारकांसाठी कला अकादमी आणि आयनॉक्स कॉम्प्लेक्सलगतची सर्व्हिस लेन उपलब्ध असेल.

Panaji Road Closure
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

विनापास वाहनांसाठी एसएजी मैदान आणि फुटबॉल मैदान येथे पार्किंगची सोय करण्यात आली आहे. डी. बी. मार्गासह शहरातील कोणत्याही पदपथावर वाहन पार्क करण्यास सक्त मनाई आहे. नागरिक, पर्यटक आणि प्रतिनिधींची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा होऊ नये, यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी निर्धारित पार्किंगस्थळांचाच वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयनॉक्स रस्ता नऊ दिवस बंद

इफ्फीच्या संपूर्ण कालावधीत म्हणजेच २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान पणजीतील महत्त्वाच्या मार्गावर वाहतूक बंद राहणार आहे. पणजी मार्केटला डी. बी. मार्गाशी जोडणारा आयनॉक्स रस्ता अर्थात जनरल बर्नार्ड गुएडेस रोड, पणजी मार्केट कॉम्प्लेक्सजवळ सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.