IFFI 2026 | इफ्फी 2026 मध्ये मनोरंजनाची मेजवानी! यंदा ॲनिमेशनपटांसह OTT चा धमाका

IFFI 2026 | इफ्फी महोत्सवात यंदा प्रेक्षकांसाठी विशेष ॲनिमेशनपट विभागाचा समावेश करण्यात आला आहे.
IFFI 2026
IFFI 2026 pudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : इफ्फी महोत्सवात यंदा प्रेक्षकांसाठी विशेष ॲनिमेशनपट विभागाचा समावेश करण्यात आला आहे. मानवी भावना, आशा आणि संवेदनशीलतेचा वेध घेणारे जागतिक दर्जाचे ॲनिमेशनपट या विभागातून प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. यात सादर होणाऱ्या प्रमुख दोन चित्रपटांमध्ये 'मॅजिक ॲटलास' आणि 'रे गन' यांचा समावेश आहे.

IFFI 2026
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

'मॅजिक ॲटलास' (सिंगापूर | २०२६ | चिनी भाषा) हा दिग्दर्शक सन शुन यांचा प्रेक्षणीय आणि विचारप्रवर्तक ॲनिमेशनपट आहे. लुओचा नावाच्या कोळसा खाणींच्या शहरात एका रहस्यमय जादूगाराचे आगमन झाल्यानंतर निर्माण होणारी भीती आणि संघर्ष, अशी या चित्रपटाची कथा आहे. भूतकाळ विसरण्यास भाग पाडणाऱ्या एका राजकीय विधीदरम्यान घडणाऱ्या घटनांसह एका अनाथ मुलाभोवती ही कथा गुंफण्यात आली आहे.

स्मृती आणि प्रतिकार यांचे प्रभावी रूपक या चित्रपटातून मांडण्यात आले आहे. लोकार्नो आणि टोकियो चित्रपट महोत्सवांमध्ये स्पर्धात्मक विभागात सहभागी झाल्यानंतर हा चित्रपट आता इफ्फीमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'रे गन' (अमेरिका | २०२६ | इंग्रजी भाषा) हा ऑस्करविजेते दिग्दर्शक ब्रॅड बर्ड यांचा विज्ञानकथाप्रधान ॲनिमेशनपट आहे.

'इफ्फी'मध्ये डिजिटल मनोरंजनाला विशेष स्थान

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) ५७ व्या आवृत्तीत यंदा डिजिटल मनोरंजनाला विशेष व्यासपीठ मिळणार आहे. महोत्सवातील सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे.

भारतीय डिजिटल मनोरंजन क्षेत्र समृद्ध करणाऱ्या आणि नवनवीन प्रयोग करणाऱ्या कलाकारांच्या योगदानाचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या मालिकांमध्ये 'मयासभा : द राइज ऑफ द टायटन्स' आणि 'मुसाफिर कॅफे' या दोन मालिकांचा विशेष समावेश आहे. 'मयासभा : द राइज ऑफ द टायटन्स' (दिग्दर्शक : देवा कट्टा) ही मालिका १९७० च्या दशकातील आंध्र प्रदेशच्या राजकीय पार्श्वभूमीवर आधारित राजकीय थरारपट आहे तर 'मुसाफिर कॅफे' (दिग्दर्शक : रुचिर अरुण) या मालिकेत प्रेम, जोडीदाराची साथ आणि आत्मशोध या विषयांचा वेध घेण्यात आला आहे.

IFFI 2026
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

'ओटीटी'चा विस्तार; सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कारासाठी नामांकने जाहीर

या नामांकनांमधून भारतातील विविध प्रादेशिक संस्कृती, सामाजिक वास्तव आणि नवनवीन विषयांना व्यासपीठ मिळत असल्याचे दिसून येते. सरकारी शाळांमधील समस्या, ग्रामीण लोककथांमधील रहस्ये, भारताचा औद्योगिकीकीय प्रवास तसेच राजकीय घडामोडी आणि मानवी नात्यांचे विविध पैलू अशा अनेक विषयांना समकालीन भारतीय डिजिटल मनोरंजन क्षेत्रात स्थान मिळत आहे. ओटीटी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामुळे भारतीय आशयप्रधान मनोरंजनाला नवी दिशा मिळत असून, विविध भाषांतील आणि प्रदेशांतील कथा जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी निर्माण होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.