IFFI 2026 Goa | इफ्फीच्या गोवा विभागासाठी चित्रपट प्रवेशिका स्वीकारण्यास प्रारंभ

IFFI 2026 Goa | पणजी येथे होणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) विशेष गोवा विभागातील फीचर आणि नॉन-फीचर चित्रपटांच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
IFFI 2026 Goa
IFFI 2026 Goa
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पणजी येथे होणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) विशेष गोवा विभागातील फीचर आणि नॉन-फीचर चित्रपटांच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाने याबाबत घोषणा केली आहे.

IFFI 2026 Goa
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पणजी येथे होणार आहे. गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जादार चित्रपटांचा प्रचार करणे तसेच स्थानिक चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देणे, हा या विशेष विभागाचा मुख्य उद्देश आहे.

गोव्यातील दिग्दर्शकांसाठी हा विभाग महत्त्वाचा ठरणार असून, स्थानिक दिग्दर्शकांना त्यांच्या स्वतंत्र दृष्टिकोनातून तयार केलेल्या कथा सादर करण्याची संधी मिळणार आहे.

IFFI 2026 Goa
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

गोवा प्रीमियर विभागातील फीचर आणि नॉन-फीचर तसेच गोवा नॉन-प्रीमियर विभागातील फीचर आणि नॉन-फीचर अशा श्रेणींमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळेल.

चित्रपटांच्या प्रवेशिका आणि आवश्यक साहित्य सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर आहे. निर्माते आणि दिग्दर्शक एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज व नियमावली डाउनलोड करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news