Deepak Dhavalikar MGP Goa | भाजपशी युती तुटली तर 'एकला चलो रे' : मगोप अध्यक्ष ढवळीकर

Deepak Dhavalikar MGP Goa | वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर चर्चा
There will be a MGP-BJP alliance in 2027: Deepak Dhavalikar
दीपक ढवळीकर Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
भाजपसोबत पाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर युती तोडण्याऐवजी तडजोडीने पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तरीही भाजपची युती तुटली तर 'एकला चलो रे'चा मार्ग निवडणार, असे मगोपाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले. पणजीत पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. ३१) झाली. त्यानंतर ढवळीकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. यावेळी पक्षाच्या कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित होते.

There will be a MGP-BJP alliance in 2027: Deepak Dhavalikar
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

ढवळीकर म्हणाले, पक्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा ही पक्षाचे संरक्षक कवच असते. आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत युतीची चर्चा झालेली नाही. त्याऐवजी निवडणूक आयोगाने मागितलेल्या आवश्यक कागदपूर्तीची चर्चा करण्यात आली. आजच्या सभेत विद्यमान समितीला पाच वर्षांसाठी मुदतवाढ, केंद्रीय समितीला निवडणुकीसंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार, महिला विभागाला मान्यता आदी ठराव मंजूर करण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमही भाजप सोबत आहोत. तरीही १६ मतदारसंघात आमची तयारी सुरू आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही पाच जागा निश्चित जिंकू. मगोपाचे आमदार पूर्वी काँग्रेस नेत होते, तर आता भाजप ते करत आहे. ज्यांना जायचे होते ते गेले. तरीही पक्ष एकसंघ आहे. जोवर कार्यकर्ते आणि मतदार आहेत, तोवर पक्षाला काहीच फरक पडत नाही.

There will be a MGP-BJP alliance in 2027: Deepak Dhavalikar
Foreign Woman Rape Case | परदेशी महिलेवरील बलात्कारप्रकरणी बंगळुरुस्थित खासगी कंपनीच्या सीईओला पणजी महिला पोलिसांकडून अटक

मात्र, जे मगो सोडून गेले ते पुन्हा कधीच यशस्वी झाले नाहीत, असे नमूद करून ढवळीकर म्हणाले, भाजप हा मोठा पक्ष आहे. आम्ही एकमेकांच्या सहकार्याने राहणार आहोत. कोणत्या जागा लढवाव्यात याचा निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ निवडणूक जाहीर होताच दुसऱ्याच दिवशी घेईल. आजच्या बैठकीसाठी आमदार जीत आरोलकर उपस्थित होते. आरोलकर हे मगोचे आमदार आहेत. येत्या निवडणुकीत पुन्हा मांंद्रेची उमेदवारी त्यांनाच दिली जाणार आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

... तर शिरोळ्यातूनच लढणार

मगो अध्यक्ष कोणत्या मतदारसंघातून लढणार, असे पत्रकारांनी विचारले असता दीपक ढवळीकर म्हणाले, शिरोळ्यातूनच लढणार; मात्र ते युतीवर अवलंबून आहे. भाजपसोबतची युती तुटली तर कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार तेथून लढणार आहे. ढवळीकर कुटुंबाचे दहा उमेदवार होऊ द्या, जो काम करतो, समाजासाठी वावरतो त्यांना पक्षाची उमेदवारी दिली जाईल. आम्हाला कोणी घराणेशाहीविषयी शिकवण्याची गरज नाही. आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा आणि सर्व्हे करूनच निर्णय घेत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.