Goa Kadamba bus stand permission issue | विनापरवाना कदंब बसस्थानकचे काम सुरू कसे ?

मुरगाव पालिका बैठकीत मुद्दा गाजला; संबंधित संस्थेकडून काम काढून घेण्याची मागणी
Goa Kadamba bus stand permission issue
Goa Kadamba bus stand permission issue pudhari photo
Published on
Updated on

Goa Kadamba bus stand permission issue

वास्को : मुरगाव पालिकेची परवानगी न घेता हिंदूस्थान पेट्रोलियम (एचपीसीएल) च्या जागेत तात्पुरते स्वरुपात कर्दब बसस्थानक उभारण्यासंबंधीचे काम करण्यासाठी कोणी परवानगी दिली आहे? यासंबंधी कोणता करार आला आहे? वगैरे प्रश्नांनी शुक्रवारची (दि. १५) मुरगाव पालिका मंडळाची खास बैठक गाजली. या बैठकीत शांतीनगर येथील पीपल्स फॉर अनिमल या संस्थेकडून काम काढून घेण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. त्या संस्थेचे काम चांगले असल्याचे सांगून बहुतांश सदस्यांनी विरोध दर्शविला. विविध विक्रेत्यांकडून सॅनिटरी शुल्क घेण्यासंबंधीही चर्चा करण्यात आली.

मुरगाव पालिका मंडळाचा कालवधी २५ मे रोजी संपतो. त्यामुळे शुक्रवारी घेण्यात आलेली खास बैठक ही या मंडळाची शेवटची होती. या बैठकीला नगराध्यक्ष गिरिष बोरकर, मुख्याधिकारी सिध्दीविनायक नाईक तसेच नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

या बैठकीत नोटीशीतील विषय बाजूलाच राहिला. कदंब बसस्थानकासंबंधी अधिक चर्चा झाली. एकमेकांना दूषणे देण्याचा प्रकारही घडला. मुरगाव पालिकेला हिंदूस्थान पेट्रोलियमने परत केलेली सुमारे ९ हजार चौरस मीटर जागा आहे. या जागेवर तात्पुरते स्वरूपात कदंब बसस्थानक उभारण्यात येणार आहे. वास्को कदंब बसस्थानकाच्या जागी नवीन बसस्थानक बांधण्यात येणार असल्याने कदंब बसस्थानक शहर भागातील एचपीसीएललगत हलविण्यात येणार आहे. मात्र कंत्राटदारातर्फे काम सुरु करण्यात आले आहे. तथापी त्यासाठी मुरगाव पालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याबद्दल काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला.

एचपीसीएल जागेसंबंधी कदंब महामंडळाकडे करार करण्यात आला आहे, उद्या बसस्थानकाचे काम पुढे सरकले नाही, तर ती जागा कदंबाच्या ताब्यातच राहिल. ते परवानगीशिवाय काम कसे सुरू करण्यात आले? त्यासाठी कोणी खास परवानगी दिली आहे काय? तेथील अपघातप्रवण क्षेत्र ठरण्याची भीती आहे? तेथील एकंदर वाहतूक व्यवस्थेसंबंधी अहवाल सादर करण्यात आला नाही, तेथे काम सुरु करण्यासंबंधी योग्य सोपस्कार करण्यात आलेले नाही वगैरे प्रश्न नगरसेविका प्रिया राऊत यांनी विचारले. सदर जागेसंबंधीचा प्रस्ताव स्थगित करावा असे त्यांनी सांगितले.

दामू नाईक यांनी उद्या कंदब बसस्थानकाच्या कामासाठी विलंब लागला तर एचपीएलसीची जागा कदबंच्या ताब्यात राहण्याची भीती व्यक्त केली. तथापी नगराध्यक्ष बोरकर यांनी आम्ही लवकरच कदंबकडे करार करणार आहोत. सरकारी दरानुसार तेथे भाडे आकरण्यात येणार आहे. जेणेकरून मुरगाव पालिकेला महसूल मिळणार आहे असे स्पष्ट केले. त्या जागेवर फक्त बसस्थानक उभारण्यात येते की, बसस्थानकासह डेपो ही होणार आहे. यासंबंधी काही माहिती नाही. यासंबंधी आम्हाला माहिती देण्याची गरज होती, असे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून त्या जागेच्या भाडेदरसंबंधी माहिती आल्यावर पुढील सोपस्कार करण्यात येणार आहे, असे बोरकर यांनी सांगितले. शांतीनगर येथे पीपल्स फॉर अनिमलच्या कारभारासंबंधी चर्चा करण्यात आली. त्या संस्थेला कारभार सुधारण्यासाठी तीन महिन्याचा अवधी देण्यात आला होता. परंतु तक्रारी कमी झाल्या नसल्याचे नगराध्यक्ष बोरकर यांनी सांगितले. तेथे सर्व दुर्दशा झाली आहे. कुत्र्यांचे हाल होतात. त्यासंबंधी लोकांनी फोटो पाठविले असल्याचे बोरकर यांनी सांगितले. काही सदस्यांनी त्या संस्थेचे काम चांगले असल्याचे सांगितले. तसेच कराराचा कालावधी जूनमध्ये संपणार असल्याने आताच चर्चा करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.

काहींकडून नाराजी; काहींकडून समाधान

नगरसेवक फेड्रिक हैब्रिक्स यांनी तेथ जंतूनाशकाची फवारणी नियमित करण्याची गरज व्यक्त केली. तर स्थानिक नगरसेविका श्रध्दा महाले यांनी सदर संस्थेला ती जागा अपुरी पडत असल्याने संस्थेचा कारभार मोठ्या जागेत हलविण्याची गरज व्यक्त केली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी खास बैठक बोलाविण्यात आली होती; परंतु बहुतांश सदस्यांनी त्या संस्थेच्या कारभारासंबंधी समाधान व्यक्त केले.

शुल्क गोळा करण्याची पद्धत वेगवेगळी

मुरगाव पालिकेकडून गोळा करण्यात येणारा स्वच्छता विषयक शुल्क संबंधी चर्चा झाली. व्यापारी, विक्रेते व इतर संबंधित जेव्हा परवानांचे नूतनीकरण करण्यासाठी येतात, तेव्हा त्यांनी स्वच्छता विषयक शुल्क भरल्याची पावती दाखविण्याची गरज आहे. सदर शुल्क तीन व्यक्ती गोळा करतात. प्रत्येकाची पध्दत वेगळी आहे. त्यामध्ये समानता नाही. एक लहान पावती देतो, दुसरा पीओएस मशिनवर पावती देतो, तर तिसरा हाताने लिहलेल्या पावत्या देतो. त्यामुळे गोंधळ उडत असल्याचे सांगण्यात आले. करण्यासाठी खास बैठक बोलाविण्यात आली होती; परंतु बहुतांश सदस्यांनी त्या संस्थेच्या कारभारासंबंधी समाधान व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news