Margao | मडगाव ठप्प! आंदोलकांनी बसेस रोखल्या, विद्यार्थ्यांचे हाल, नेमकं काय घडलं?

सुभाष वेलिंगकरांच्या अटकेच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन
Margao
मडगाव - कोलवा सर्कल ते केटीसीपर्यंत लागलेल्या वाहनांच्या रांगा. (Pudhari Photo)
Published on
Updated on

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या डीएनए चाचणीची मागणी करणारे प्रा. सुभाष वेलिंगकर (Subhash Velingkar) यांना अटक न केल्याचा निषेधार्थ मडगावात (Margao) लोक रस्त्यावर उतरले. आज प्रक्षुब्ध जमावाने माथानी साल्ढाना संकुलात जाणारा मार्ग लाकडाचे ओंडके टाकून बंद केला. यामुळे जिल्हा प्रशासनच कोंडीत सापडले. कदंबा बसस्थाकावरून गेल्या पाच तासांत एकही बस बाहेर (Heavy protests in Margao) गेलेली नाही. शेकडो प्रवाशी बसस्थानकावर अडकले. फातोर्डा परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही घरी परतण्यापासून रोखण्यात आले. मडगावात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आलेल्या पालकांची चुकामूक झाल्याने अनेक विद्यार्थी अडकून पडले.

सुभाष वेलिंगकर नेमके काय म्हणाले होते?

सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे शव श्रीलंकेतील एका बौद्ध भिक्षुकाचे आहे, असा दावा पूर्वीपासून होता. त्या अनुषंगाने त्यांची डीएनए टेस्टची केली जावी, अशी मागणी सुभाष वेलिंगकर यांनी केली होती. त्यांच्या या विधानामुळे ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी करत शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे. शनिवारी हे आंदोलन तीव्र झाले. सकाळी लोकांचा जमाव कोलवा सर्कलजवळ जमा झाला होता. कोलवा सर्कलचे चारही रस्ते बंद करुन शहरात चक्काजाम करण्याचे प्रयत्न यावेळी झाले.

खासगी बस अडवून प्रवाशांना खाली उतरवले

त्यानंतर हा जमाव कंदब बसस्थानकावर दाखल झाला. या आंदोलनाविषयी लोकांना पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे नेहमीप्रमाणे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असलेले सर्वसामान्य लोक बस पकडण्यासाठी कदंब बसस्थानकावर थांबले होते. दरम्यान, प्रवाशांना घेऊन कुडचडेला जाण्यासाठी बाहेर निघालेली खासगी बस, केटीसीच्या बाहेर अडवून धरण्यात आली. जबरदस्तीने प्रवाशांना खाली उतरवले गेले. कारण याबाबत सवाल करणाऱ्या एका प्रवाशाला धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न यावेळी झाला.

Margao
माल वाहतूक अडवताना आंदोलक.(Pudhari Photo)

Margao : पर्यटकांना पायी जाण्याची वेळ

या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिमा कुतिन्हो आणि वॉरन आलेमाव यांनी कदंबच्या काऊंटरवर जाऊन बसेस न सोडण्याची सूचना कर्मचाऱ्यानां केली. कोलवा सर्कल ते जिल्हा इस्पितळापर्यंतचा मार्ग अडवण्यासाठी रस्त्यावर लाकडे ठेवण्यात आली. सुरवातीला रुग्णवाहिका अडवल्या जात होत्या. पण पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर रुग्णवाहिका आणी खासगी वाहनांमधून इस्पितळात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना सोडण्यात आले. कित्येक लोक बसस्थानकावर अडकून पडले होते. पर्यटकांवर पायी जाण्याची वेळ आली. दमदाटी करून मालवाहतुकीच्या गाड्या अडवल्या जात होत्या.

Margao
कदंब बसस्थानकाजवळ अडवण्यात आलेली वाहने.(Pudhari Photo)

घरी जाणाऱ्या महिलांना रोखले

जिल्हाधिकारी संकुलात जाणारा मार्ग बंद केल्यामुळे सर्व प्रकारची शासकीय कामे ठप्प झाली होती. याचा सर्वात जास्त फटका जिल्हाधिकारी संकुलामागे राहणाऱ्या फातोर्ड्याच्या नागरिकांना बसला. घरी जाऊ द्या अशी विनवणी करणाऱ्या महिलांना रोखून अत्यंत वाईट वागणूक दिली जात होती. जोपर्यंत आमच्या मागण्या पुर्ण केल्या जात नाहीत; तोपर्यंत रस्ता सोडणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. पोलिसांच्या डोळ्यादेखत कायदा हाती घेतला जात होता.

आंदोलनाचा विद्यार्थ्यांना फटका

विद्यार्थ्यांना नेण्यासाठी आलेल्या त्यांच्या पालकांना अडविण्यात आले होते. हे आंदोलन नेमके कशासाठी आहे? हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती नव्हते. पालकांशी संपर्क साधता न आलेल्या विद्यार्थ्यांची अतिशय बिकट अवस्था झाली. रखरखत्या उन्हात पायपीट करत त्यांनी घर गाठले.

Margao
आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय झाली.(Pudhari Photo)
Margao
सुभाष वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी, मडगावातील आंदोलनाला हिंसक वळण

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news