.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पणजी : गोमंतकीयांना निकृष्ट दर्जाचे मांस आणि चिकन पुरवणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी चिकन व बीफची आयात करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे सहा हजार किलो चिकन जप्त करण्यात आले आहे. अन्नसुरक्षेचे नियम मोडणाऱ्या तसेच नागरिकांना निकृष्ट दर्जाचे मांस पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्यमंत्री तथा अन्न व औषध प्रशासनमंत्री विश्वजित राणे यांनी दिला.
बुधवारी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक रिचर्ड नोरोन्हा तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. गोमंतकीयांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे.
नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या बाबींना आळा घालण्यासाठी सरकार कोणतीही कसुरी करणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले. आवश्यक कागदपत्रे नसलेल्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय राज्यातील चिकन विक्रीची दुकाने आणि रेस्टॉरंटची नियमित तपासणी करण्यात येणार असून, अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्री राणे यांनी दिला.
आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक
गोव्यात आयात करण्यात येणारे चिकन आणि बीफ चांगल्या दर्जाचे असणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक करण्यात येणाऱ्या कोंबड्यांची आरोग्यविषयक स्थिती योग्य असावी आणि संबंधित व्यावसायिकांकडे आवश्यक कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.