सात हजार नोकर्‍या देणार

आरोग्यमंत्री राणे यांची कुंभारजुवे-खोर्लीतील मेगा आरोग्य शिबिरात घोषणा
health-minister-viswajit-rane-announces-5000-to-7000-new-jobs-in-health-sector
कुंभारजुवे-खोर्ली : मेगा शिबिरप्रसंगी वैद्यकीय अधिकार्‍यांकडून माहिती घेताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे.Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : चालू वर्षात आरोग्य क्षेत्रात सुमारे पाच ते सात हजार नोकर्‍या निर्माण केल्या जातील, अशी घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी खोर्ली येथे आयोजित मेगा आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केली. युवकांना कंत्राटी व खासगी कंपन्यांमधील नोकर्‍या नको असतात, त्यांना सरकारी नोकर्‍या हव्या आहेत. आपण आरोग्य क्षेत्रात अधिकाधिक नोकर्‍या निर्माण करण्याचा ध्यास घेतला आणि नोकर्‍या दिल्या, असे मंत्री राणे म्हणाले.

कुंभारजुवे मतदारसंघातील खोर्ली येथे आरोग्य खात्यातर्फे आयोजित मेगा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार राजेश फळदेसाई यांनी दिवाडी-चोडण बेटावरील रुग्णांची व्यथा मांडली. याला उत्तर देताना आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिवाडी बेटावर 10 खाटांची क्षमता असलेले सुसज्ज इस्पितळ उभारले जाईल, असे जाहीर केले. या इस्पितळासाठी आमदारांनी जागा निश्चित करावी. लगेच ती ताब्यात घेऊन तेथे इस्पितळ उभारण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे मंत्री राणे म्हणाले.

प्रत्येकजण गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचारासाठी येतो. त्यामुळे आरोग्यसेवेवर ताण पडतो. प्रत्येक गावात चांगली आरोग्य सेवा देणे मंत्री या नात्याने आपले कर्तव्य आहे. आरोग्यसेवा जनतेच्या दारी पोहोचावी यासाठी आपली ठोस पावले उचलणार, असे ते म्हणाले. बांबोळी येथे लवकरच 350 कोटी रुपये खर्च करून कर्करोग इस्पितळ उभारले जात आहे. गोमेकॉ इस्पितळही पूर्ण सुसज्ज करण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे त्यांनी सांगितले.

गोमंतकीयांना ‘आरोग्य कवच’

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात न्यूरोलॉजी, कार्डिओलॉजी व अन्य सुविधा नाहीत. जोपर्यंत या सुविधा तेथे नाहीत, तोपर्यंत दक्षिण गोव्याच्या लोकांना आरोग्याच्या द़ृष्टीने न्याय दिला, असे आम्ही म्हणू शकत नाही. गोमंतकीय जनतेभोवती ‘आरोग्याचे कवच’ असावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मंत्री राणे म्हणाले. मडगाव येथे मेडिकल कॉलेज झाल्यावर दक्षिण गोव्यातील प्रश्न सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news