Panaji Pato Waterlogging | पाटो-पणजीत गुडघाभर पाणी

Panaji Pato Waterlogging | गटार व्यवस्था कोलमडली; वाहनचालक, पादचाऱ्यांची पुरती धांदल
Waterlogging
Waterlogging Pudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पाटो पणजी हे ठिकाण गोव्यो नरिमन पॉईंट म्हणून संबोधले जाते. अनेक मोठ्या कंपनींची मुख्यालये येथे आहेत. मात्र, येथील गटार व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्यामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत आहे.

Waterlogging
Accident Traps : वेरूळ-चिंचोली मार्गावरील खड्डे बनले अपघाताचे सापळे

संस्कृती भवन समोर एक अवाढव्य अशी खासगी इमारत उभी राहत असून या इमारतीच्या बांधकामामुळे येथील अनेक गटारे बुजल्याचे येथील सुरक्षारक्षकांनी सांगितले. ही गटारे पावसापूर्वी उपसणे गरजेचे होते. तसे न झाल्याने आता पावसात ही गटारे तुंबल्याने रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत आहे आणि त्यातूनच वाहनचालकांना वाहने पुढे न्यावी लागत आहेत.

Waterlogging
Shivendraraje Bhosale: राज्यातील घाट रस्त्यांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य

चारचाकी आणि मोठ्या वाहनांना जास्त त्रास होत नसला तरी दुचाकी चालकांची बरीच तारांबळ होत असून काहींनी या रस्त्याने न येता पर्यायी रस्त्याने जाणे सुरू केले आहे. कला व संस्कृती खात्याच्या संस्कृती भवनासमोरच हे पाणी साचत असल्यामुळे येथील वाचनालयात कला व संस्कृती खात्याच्या कार्यालयात येणाऱ्या अनेकांना या साचलेल्या पाण्याचा त्रास होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news