Sun Sand and Sea Goa | 'सन, सँड अँड सी'च्या पलीकडे गोव्याची ओळख

Sun Sand and Sea Goa | मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ; आयर्नमॅन ७०.३ मध्ये २,००० हून अधिक ॲथलिट्स
Goa News
Goa NewsPudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा
आयकॉनमॅन ७०.३ ची ही ६ वी आवृत्ती गोव्याची जागतिक क्रीडा पर्यटन केंद्र म्हणून ओळख अधिक मजबूत करत आहे. गोवा आता केवळ 'सन, सँड अँड सी' (सूर्य, वाळू आणि समुद्र) पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे गोव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी येथे केले.

Goa News
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

बीटेन सिंग ठरला आयर्नमॅन

आयकॉनमॅन ७०.३ गोवाच्या सहाव्या आवृत्तीमध्ये भारतीय लष्कराच्या बीटेन सिंग याने उत्कृष्ट कामगिरी करत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले आहे. त्याने ४ तास २४ मिनिटे २९ सेकंद (४:२४:२९) अशी वेळ नोंदवत एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. महिलांमध्ये मरिना शिलियाखतिना हिने ५:३०:२९ अशी वेळ नोंदवत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'आयकॉनमॅन ७०.३ गोवा' स्पर्धा. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाच्या स्पर्धेची ६ वी आवृत्तीचा शुभारंभ मिरामार समुद्रकिनऱ्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या स्पर्धेचा हिरवा झेंडा दाखवून केला.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, विविध पार्श्वभूमी असलेल्या खेळाडूंना एकाच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणून या स्पर्धेने जागतिक क्रीडा क्षेत्रात गोव्याचे नाव उंचावले आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या स्पर्धेच्या पुढील आवृत्तीचे उद्घाटन करण्याची इच्छा व्यक्त केली आणि शासनाचा या स्पर्धेला पूर्ण पाठिंबा राहील, असे आश्वस्त केले.

रविवारी पणजीत आयोजित या प्रतिष्ठित शर्यतीमध्ये जगातील ३० हून अधिक देशांतील २,००० पेक्षा जास्त ट्रायथॉलिस्टनी भाग घेतला होता. सर्व आवृत्त्या मिळून एकूण ६८ देशांतील खेळाडूंनी यात सहभाग नोंदवला असून, यामुळे या स्पर्धेची आंतरराष्ट्रीय व्याप्ती स्पष्ट होते.

Goa News
Foreign Woman Rape Case | परदेशी महिलेवरील बलात्कारप्रकरणी बंगळुरुस्थित खासगी कंपनीच्या सीईओला पणजी महिला पोलिसांकडून अटक

पुढील वर्षी मीच मुख्यमंत्री असेन : डॉ. सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोव्याची ओळख आता केवळ पर्यटनापुरता मर्यादित न राहता जागतिक क्रीडा स्थळ म्हणून उंचावली आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षीदेखील ही स्पर्धा गोव्यातच होईल आणि मुख्यमंत्री म्हणून मी स्वतः उपस्थित राहीन, असा ठास विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जागतिक क्रीडा उत्कृष्टता आणि सहनशक्तीचा हा सोहळा गोव्याच्या लौकिका मध्ये भर घालणारा ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.