

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात विविधांगी शिक्षणासाठी खासगी विद्यापीठांची आवश्यकता असून, अशा संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोवेकर विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या शिष्यवृत्तींचा लाभ दिला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित पारुल विद्यापीठाच्या ग्रँड ओरिएंटेशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी डॉ. देवांशू पटेल, पारुल पटेल, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, खासगी विद्यापीठांमुळे गोव्यातील विद्यार्थ्यांना राज्याबाहेर न जाता उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे शिक्षण अधिक सुलभ होत आहे.
युवकांना सक्षम बनविणार...
विद्यार्थ्यांनी विकसित भारत २०४७ साठी सक्षम योगदानकर्ते बनावे, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आरोग्य पर्यटन, तंत्रज्ञान व उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांद्वारे युवकांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.