

प्रभाकर धुरी
पणजी : मिस्टर, मिस अँड मिसेस रॉयल ग्लोबल किंग अँड क्वीनच्या सीझन 5 मध्ये विशेष क्वीन्स श्रेणीतील ‘मिस इंडिया फॅब्युलस रॉयल ग्लोबल क्वीन 2025’ चा किताब अडवई (पिसुर्ले) येथील सुप्रिया सूर्याजी देसाई हिने पटकावला.ती मूळ तिलारी धरणामुळे विस्थापित झालेल्या पाल (कुडासे खुर्द) गावची. वडील नोकरीनिमित्त गोव्यात आले आणि ती गोवेकर झाली.
डॉ. नीलम पराडिया यांनी द टोपाझ इव्हेंट्सच्या सहकार्याने पती कल्पेश पराडिया यांच्या पाठिंब्याने, मिस्टर मिस अँड मिसेस रॉयल ग्लोबल किंग अँड क्वीन 2025 चे रॉयल ग्लोबल अचीव्हर अवॉर्ड्स सीझन 5 चे आयोजन केले होते. यावर्षी ‘रॉयल ग्लोबल कपल’ चा शुभारंभ देखील झाला. सोहळा 21 व 22 जून रोजी मुंबई येथील क्लब एमराल्ड येथे आयोजित केला होता. यात यूके, सिंगापूर, यूएई, श्रीलंका आणि नेपाळमधील स्पर्धक सहभागी होते. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण सत्रे झाली. बहुप्रतिक्षित परिचय, प्रतिभा फेरी आणि प्रश्नोत्तरांचा समावेश होता.
बॉलिवूड अभिनेत्री एलेना तुतेजा, सुपरमॉडेल क्रमिक यादव, अभिनेता अली खान, ताहीर कमाल खान,कबीर सिंग राजपूत, डॉ. अर्चना चौधरी, श्याजमी हुसेन (सिंगापूर), अर्पिता मिश्रा आणि प्रियंका राजपूत यांनी ज्युरी म्हणून काम पाहिले. सुप्रिया देसाई पदवीधर असून आंतरराष्ट्रीय मॉडेल आहे. दिल्ली येथे 2022 मध्ये ती मॉडेलिंगमध्ये प्रथम उपविजेता म्हणून, 2022 मध्ये नवी मुंबई येथे भारत शक्तीमान पुरस्कार तिने पटकावला.
देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक कार्यक्रमात ती सहभागी झाली आहे. तिला मॉडेलिंग क्षेत्रातच करिअर घडवायचे आहे. यशाचे श्रेय ती पालकांना देते. माझे पालक माझे आधारस्तंभ आहेत आणि या कामगिरीसाठी ते मला मोठा आधार आहेत, असे ती अभिमानाने सांगते.