Goa Road Accident Death | गोव्यात रस्ते अपघातांचे भीषण वास्तव! दर 28 तासांना एकाचा नाहक बळी; 'गोवा कॅन'चा गंभीर इशारा

Goa Road Accident Death | रस्ता सुरक्षेसाठी सरकारी खात्यांनी एकत्र येण्याचे 'गोवा कॅन'चे आवाहन
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यात वाढत्या रस्ते अपघातांवर आणि ढासळत्या वाहतूक व्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त करत 'गोवा कॅन'ने सर्व सरकारी खात्यांनी परस्पर समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन केले आहे. आज राज्यात दर २८ तासांनी एका व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू होत आहे. एका बाजूला गोव्याला 'जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ' म्हणतो, तर दुसऱ्या बाजूला अशा अपघातांमुळे कोणता संदेश जगासमोर जात आहे? असा सवाल या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

Accident
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

रस्ता सुरक्षा जागृतीविषयी बोलताना 'गोवा कॅन'चे संयोजक रोलंड मार्टिन्स म्हणाले, सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक पोलिस आणि पर्यटन खाते यांच्यात योग्य समन्वय नाही. रस्ता सुरच्या ऑडिट अहवालांवर योग्य अंमलबजावणी न होता ते कपाटात पडून राहतात. उड्डाणपूल आणि रस्त्यांच्या रचनेत इतर विभागांशी चर्चा केली जात नसल्याने वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत.
राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि रस्ता सुरक्षा जागृती मोहिमेतील प्रतिनिधींनी पणजीतील फेरी धक्का परिसरात वाहनचालक आणि नागरिकांत जागृती केली.

Accident
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

बाजारात ३०० ते ४०० रुपयांत विकले जाणारे बनावट हेल्मेट सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत. 'ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स'ने अशा बनावट हेल्मेटविक्रेत्यांवर तत्काळ जप्तीची कारवाई केली पाहिजे.

आगामी काळात रस्त्यांवर बसवण्यात आलेले एआय कॅमेरे बनावट हेल्मेट ओळखण्यास सक्षम असतील आणि थेट दंड ठोठावतील अशी अंमलबजावणी केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पंचायती आणि नगरपालिका निधीअभावी कामे होत नसल्याचे सांगतात, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहतूक दंडातील ५० टक्के रक्कम ही 'रोड सेफ्टी फंड'मध्ये जमा होते. सध्या या निधीत सुमारे १२५ कोटी रुपये पडून आहेत, असे मार्टिन यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news