

पणजी : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकीमध्ये सत्तरीतील चारही मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे व पर्येच्या आमदार डॉ. देविया विश्वजित राणे यांचे हे मतदारसंघ भाजप जिंकेल हे सर्वाना माहित होते. मात्र आघाडी किती मिळेल, याकडे सर्वाचे लक्ष होते आणि २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ देविया राणे यांनी १४ हजाराची आघाडी घेऊन विजय संपादन केला होता. त्यांच्या केरी जिल्हा पंचायत मतदारसंघात नीलेश परवार यांनी १२,१२८ मतांची आघाडी घेऊन विजय मिळवला. तसेच होंडा मतदारसंघातून नामदेव च्यारी यांनी १०,६४४ मतांची आघाडी घेऊन विजय संपादन केला. तर विश्वजीत राणेच्या वाळपईत येणाऱ्या नगरगाव मधून प्रेमनाथ दळवी यांनी १०,३२० व उसगाव गांजे मतदारसंघातून समीक्षा नाईक यांनी ३,३६८ मतांची आघाडी घेऊन सत्तरीत भाजपचा चौकार मारला आणि सत्तरी तालुक्यातील चारही मतदारसंघावर राणे दांपत्याचा पगडा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
मुख्यमंत्र्यांनी दाखवली ताकद
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघांमध्ये साखळी पालिका वगळल्यानंतर फक्त पाळी हा एकमेव जिल्हा पंचायत मतदारसंघ राहतो. साखळी मतदारसंघातील कुडणे पंचायत कारापूर सर्वण जि.पं. मध्ये तर हरवळे पंचायत होंडा जिल्हा पंचायतीमध्ये समाविष्ट केली गेली. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पाळीमध्ये सुंदर नाईक या सामान्य कार्यकर्त्याला उभे करून जिंकून आणले. तेही तब्बल ९२५१ मतांनी. पाळीतील भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याच्या आदेशाचे पालन केले. साखळी विधानसभा मतदारसंघातील कुडणे पंचायतीतील मते कारापूर सर्वणचे विजयी उमेदवार महेश सावंत यांना तर हरवळेची मते होंडाचे विजयी उमेदवार नामदेव च्यारी यांना मिळाली.