

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयाने शनिवारी (दि. २०) होणाऱ्या जिल्हा पंचायतीच्या मतमोजणीसाठी राज्यात १५ केंद्रे जाहीर केली आहेत. सोमवारी (दि. २२) मतमोजणी होणार आहे.
फोंडा, बार्देश व सासष्टी या मोठ्या तालुक्यांत जास्त मतदारसंघ असल्याने तेथे प्रत्येकी दोन मतमोजणी केंद्रे असणार आहेत. पेडणे तालुक्यासाठी मल्टिपर्पस स्पोर्टस् स्डेडियम सावळवाडा, बार्देश तालुक्यात बॉक्सिंग हॉल, पेड क्रीडा संकुल व बॅडमिंटन हॉल पेडे क्रीडा संकुल पेडे, तिसवाडी तालुक्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम बांबोळी.
डिचोलीत नारायण झांट्ये बहुउद्देशीय सभागृह, सर्वण, सत्तरीत कदंब बस स्टैंड हॉल, फोंडा तालुक्यात सरकारी आयटीआय सभागृह हॉल, फार्मगुडी व ड्राप्टसमन सिव्हील वर्कशॉप सरकारी आयटीआय फार्मगुडी,
सासष्टीत माथाना साल्ढाणा प्रशासकीय संकुल तळमजला उत्तरेकडील बाजू व सीएफसी सेंटर जवळ, दक्षिण बाजू, धारबांदोडा येथे सरकारी कार्यालय संकुल इमारत, सांगेत सरकारी क्रीडा संकुल, केपेत सरकारी क्रीडा संकुल, काणकोणात सरकारी उच्च माध्यमिक शाळा शेळेर व मुरगाव तालुक्यासाठी मुरगाव पोर्ट इन्स्टिट्यूट सभागृह वास्को अशी मतमोजणी केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत.
मतदानासाठी २० रोजी भर पगारी सुट्टी
काम करणारे कामगार, व्यवसायिक आस्थापनात काम करणारे कामगार, खासगी आस्थापनात काम करणारे कामगारांना ही भर पगारी सुट्टी असेल.